पगारवाढीसाठी कामगार संपावर, सरपंच सफाईसाठी रस्त्यावर
By admin | Published: April 6, 2017 12:15 PM2017-04-06T12:15:42+5:302017-04-06T12:15:42+5:30
पगारवाढ मिळावी या मागणीसाठी चोपडा तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतीचे सात कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून संपावर गेलेले आहेत.
Next
धानोरा,दि.6- पगारवाढ मिळावी या मागणीसाठी चोपडा तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतीचे सात कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून संपावर गेलेले आहेत. सफाई कामगारांनी असहकार पुकारल्यानंतर सरपंच व ग्रा.पं.सदस्यांनी झाडू हातात घेत साफसफाई सुरु केली आहे.
धानोरा ग्रामपंचायतीत 9 सफाई कामगार आहेत. यापैकी दोन सफाई कामगारांना सहा हजार रूपये पगार आहे. तर उर्वरित सात सफाई कामगारांना केवळ तीन हजार रूपये पगार देण्यात येतो.
ग्रामपंचायतीत असलेल्या इतर कर्मचा:यांप्रमाणेच आम्हालाही सहा हजार रूपये पगार मिळावा या मागणीसाठी गोपी मांगीलाल चिरवंडे, सुनीता गोपी चिरवंडे, राकेश गोपी चिरवंडे, विशाल गोपी चिरवंडे, चंदू रमेश सोनवणे, परशुराम पितांबर मांग, आशा छगन पातोंडे हे सात कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून संपावर गेले आहे. सद्यस्थितीत दोन सफाई कामगाराच कामावर आहेत.
सफाई कामगार संपावर गेल्याने गावात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत.
दरम्यान येथे गुरूवारी आठवडे बाजार भरत असतो. मात्र त्याठिकाणी अस्वच्छता असल्याने, आज सरपंच कीर्ती किरण पाटील, उपसरपंच अशोक साळुंखे व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: हातात झाडू घेत बाजारात साफसफाई केली.