कोविड रुग्णालयात काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:41 AM2020-07-01T11:41:57+5:302020-07-01T11:42:56+5:30
ठेकेदार पद्धतीला विरोध : दोन महिन्यातील दुसरे आंदोलन
जळगाव : वर्ग चार मधील कर्मचारी यांची भरती ही सरळ सेवेच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी मान्यता असताना शासन तसे न करता ठेकेदारपद्धतीने भरती करत असून याचा निषेध म्हणून राज्य सरकारी गट ड कर्मचारी महासंघाच्या वतीने कोविड रुग्णालयात वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे़ विविध मागण्यांसंदर्भात या कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांना निवेदन दिले आहे़ दरम्यान, कोविड रुग्णालयातील दोन महिन्यातील हे दुसरे आंदोलन आहे. या पूर्वी सफाई कर्मचाºयांनी वेतनासाठी आंदोलन केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १५ जून रोजी निवेदन दिले होते़ त्यात रुग्णसेवेशी संबधित गट ड, वर्ग ४ मधील कर्मचारी यांना सरळ सेवेच्या कोट्यामधून शंभर टक्के कर्मचाºयांची पदे भरण्याबाबत मान्यता दिली होती़ मात्र, ही पदे ठेकेदार पद्ध तीनेच भरली जात आहे़ यासह तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत ९२२ कर्मचाºयांना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धततीने कार्यरत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना शासन सेवे कायम करावे, कंत्राटी भरीत बंद करावी, अनुकंपा व वारसाह क्काची प्रकरणे लवकर निकाली काढावी, पदोन्नतीचा विषय मार्गी लावाला अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे़ निवेदन देताना संघटनेचे विभागीय संघटक पवन सैंदाणे, जिल्हाध्यक्ष मंगेश बोरसे, जिल्हा सरचिटणीस चेतन परदेशी, जिल्हा सचिव संजय चित्ते, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप सोनवणे, प्रदीप चंदन, अनिल बागलाणी, अनिल सपकाळे, राजू सपकाळे, किशोर कुलकर्णी, दीपक साबळे, डिगंबर पाटील, रामचंद्र तागवाले, मिनल सोनवणे आदी उपस्थित होते़
कोविड असल्याने काम बंद नाही
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष सेवक, सफाई कामगार, शिपाई यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे़ ३० जून ते २ जुलैपर्यंत काळ्या फिती लावून निषेधात्मक आंदोलन करण्यात येणार आहे़ कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने काम बंद आंदोलन न करता, कामावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने हे निषेधात्मक आंदोलन केले जात असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे़
विलगीकरणाची व्यवस्था व्हावी
कोविड कक्षात कर्तव्य बजावणाºया वर्ग चार कर्मचाºयांची निवासस्थाने अगदीच लहान असल्याने त्यांच्या विलगीकरणासाठी इतरत्र सुरक्षित ठिकाणी सोय करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे़