पेट्रोलपंपावर काम करून मुलांना उच्चशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:54 PM2018-03-08T12:54:54+5:302018-03-08T12:54:54+5:30
आदर्श
विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ८ - घरची जबाबदारी संभाळत पेट्रोलपंपवर काम करणाºया महिला आपल्या मुलांना दर्जेदार व उच्चशिक्षण देत असून याद्वारे त्यांनी समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. ज्या क्षेत्रात पुरूषच काम करीत तेथेही आता महिलांचा सहभाग वाढतो आह
आपली मुले उच्चशिक्षित व्हावे, ते पुढे जावे, असे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. यासाठी पिता हा त्याच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करीत असतोच. सोबतच उच्चशिक्षित महिलाही नोकरी करून यास हातभार लावत असतात. मात्र मोठी नोकरी मिळणे कठीण असताना आपलेही मुले पुढे नेण्यासाठी परिश्रम करणाºया महिलाही समाजात आहे. अशाच प्रकारे जळगावातील चार महिला पुढे सरसावत पेट्रोलपंपवर काम करून घरात हातभार लावत आहे.
अर्चना चांदेलकर, आशा निंबाळकर, मीना सोनवणे, माया मराठे या चौघी जणी पेट्रोलपंपवर इंधन भरण्याचे काम करतात. अर्चना चांदेलकर, आशा निंबाळकर या तीन वर्षांपासून तर मीना सोनवणे व माया मराठे या चार वर्षांपासून पेट्रोलपंपवर काम करीत आहेत.
वेळेचे योग्य नियोजन
सकाळी कामावर येणे व रात्री घरी गेल्यानंतर कामे करण्यासह मुलांना वेळ देणे, त्यांचा अभ्यास याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून या महिला मुलांना चांगले शिक्षण देत आहेत. यामध्ये अर्चना चांदेलकर यांची मुलगी बारावीला तर माया मराठे यांची मुलगी दहावीला आहे. इतर दोन महिलांचेही मुले शिक्षण घेत असून त्यांना उच्चशिक्षित करण्याचा मनोदय या महिलांचा आहे. मुले शिकून मोठी व्हावीत अशी अपेक्षाही या महिलांनी व्यक्त केल्या.
दोन्ही जबाबदारी यशस्वी... या महिला दोन वेळांमध्ये काम करतात. यात सकाळी ८ ते दुपारी ३ व दुपारी ते ३ ते रात्री ९ या वेळेत काम करीत असताना सकाळी जर कामावर यायचे झाल्यास आठ वाजेपूर्वी घरातील संपूर्ण जबाबदारी पूर्ण करीत त्या कामावर पोहचतात. रात्री ९ वाजता पुन्हा घरी गेल्यावर घरातील कामे पूर्ण करीत असतात.
ग्राहक देवो भव...
पेट्रोलपंपवर इंधन भरताना कोणी कोणत्याही कारणावरून वाद घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी नम्रपणे बोलून त्यांना समजावून सांगत या महिला ग्राहक देवो भव... प्रचिती आणून देतात.
समान न्याय
गेल्या ४ वर्षांपासून येथे काम करीत आहे मात्र घर आणि काम यास वेळ देऊ शकले नाही, असे होत नाही. आता या सर्वांची सवय झाली असल्याने दोघांना समान न्याय देऊ शकतो. -माया मराठे
जबाबदारी १०० टक्के पार पाडतो
काम करीत असताना कुटुंबाकडेही दुर्लक्ष व्हायला नको. पण कामाला महत्त्व देऊन आपली जबाबदारी १०० टक्के पार पाडण्याचा प्रयत्न करीत असतो.
-मीना सोनवणे.
मुले आनंदी
पेट्रोलपंपवर वेगवेगळ््या प्रकारचे ग्राहक येत असतात, मात्र त्यांच्याशी कधी वाद होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. घरीही पुरेसा वेळ देऊन मुलांना आनंदी ठेवत असतो.
-अर्चना चांदेलकर.
पुढाकार घ्यावा
महिलांनी घरात बसून न राहता काही ना काही केले पाहिजे. यामुळे आपल्या संसारास हातभार लागतोच, सोबतच मुलांनाही चांगले शिक्षण देण्यासाठी मदत होते. यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे.
-आशा निंबाळकर. े