कपाशीचे अनुदान मिळविण्यासाठी कसरत
By Admin | Published: March 29, 2017 12:32 AM2017-03-29T00:32:09+5:302017-03-29T00:32:09+5:30
जामनेर तालुका : लाभासाठी अनेक जाचक अटींचा करावा लागणार सामना
वाकोद, ता. जामनेर : मागील वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून आता शासनाकडून १० कोटींचे अनुदान जामनेर तालुक्यातील शेतकºयांसाठी तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे़ एक तर उशिरा मिळालेल्या तोकड्या मदतीसाठी शेतकºयांना अनेक अडचणींवर मात करीत हे अनुदान मिळवावे लागणार असल्याची स्थिती आहे़ यासाठी विविध कागदपत्रांसह अनेक जाचक अटी ठेवण्यात आलेल्या आहेत़ यामुळे कमीत कमी शेतकºयांपर्र्यंत हा लाभ पोहोचेल अशी व्यवस्था सरकारने या नियमांमधून केलेली आहे़, असा शेतकºयांचा आरोप आहे.
गेल्या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ ही बाब लक्षात घेऊन शासनाने मागील वर्षी जामनेर तालुक्यात मका, कपाशी या पिकांसाठी नुकसान भरपाई म्हणून अनुदान जाहीर केले होते़ यापैकी मका पिकासाठी सुमारे २१ कोटी रुपयांचे अनुदान लाभार्थी शेतकºयांना वाटप केले होते़
शासनाकडून हे अनुदान वेळेवर प्राप्त झाले होते, तरी जिल्हा बँकेच्या काही अडचणींमुळे हे अनुदान शेतकºयांना वाटप करण्यात खूपच विलंब लागला होता़ या हंगामातील उर्वरित कपाशी पिकाचे अनुदान गेल्या काही दिवसांपूर्वीच जामनेर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे़ यात सुमारे १० कोटी १८ लाख रुपये रक्कम हंगाम २०१५ मधील दुष्काळी कपाशी पिकासाठी अर्थसाह्य म्हणून अनुदान मिळाले आहे़ हे अनुदान वाटपासाठी तलाठीवर्गाकडून अनुदान लाभार्र्थींच्या याद्या बनविण्याचे काम सुरू आहे़
अनेक ठिकाणी याद्यांमध्ये घोळ
वाकोद व परिसरातील गावांसह तालुक्यातील अनेक गावांत शासनाकडून मिळणाºया विविध अनुदानासाठी पात्र लाभार्र्र्थींच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत़ मात्र या याद्यांमध्ये प्रचंड घोळ असून बºयाच शेतकºयांचे बँक खाते क्रमांक व नाव चुकलेले आहे. तसेच अनेक शेतकºयांची तर नावेच याद्यांमध्ये नाहीत, तर काहींची नावे पुन्हा आलेली असतात़ अनेक शेतकºयांचा पीकपेरा सातबारा उताºयावर चुकलेला आहे़ अशा अनेक त्रुटी असल्याने शेतकºयांना हे अनुदान मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते़ परिणामी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात बराच वेळ यात जात असल्याने अनेक शेतकरी हैराण झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.
मागील वर्षाच्या दुष्काळात कपाशी व सोयाबीन अनुदानाची १० कोटींच्या जवळपास रक्कम जामनेर तहसीलला प्राप्त झालेली असून, लवकरात लवकर अचूक याद्या संबंधित तलाठ्यांकडून बनविण्याचे काम सुरू आहे़ त्वरित हे अनुदान लाभार्थी शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
-परमेश्वर कासुळे, नायब तहसीलदार, जामनेर
गेल्या अनेक वर्षांपासून मी हरिनगर, ता. जामनेर शिवारात शेतजमीन घेतली. राहायला बाहेरगावी असून, दरवर्षीच्या याद्यांच्या घोळामुळे मी या अनुदानापासून नेहमी पाठपुरावा करूनही वंचित राहत आहे.
-भागचंद पारख, शेतकरी