परराष्ट्रीय धोरणाच्या नवीन परिणामावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 09:07 PM2021-03-01T21:07:01+5:302021-03-01T21:07:01+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने ह्यभारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे नवीन परिणामह्ण या ...

Workshop on New Impact of Foreign Policy | परराष्ट्रीय धोरणाच्या नवीन परिणामावर कार्यशाळा

परराष्ट्रीय धोरणाच्या नवीन परिणामावर कार्यशाळा

googlenewsNext

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने ह्यभारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे नवीन परिणामह्ण या विषयावर सात दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली.

२० ते २७ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या कार्यशाळेत कोरोना काळात भारताने कोविड डिप्लोमेसीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर गरजू राष्ट्रांना दिलेल्या वैद्यकीय मदतीमुळे निर्माण झालेली प्रतिमा यावरही कार्यशाळेत चर्चा झाली. या चर्चासत्रात डॉ.लियाकत खान, डॉ.विजय खरे, ब्रिगेडीअर हेमंत महाजन, मोहम्मद मुदस्सर कमर, रोहन चौधरी, डॉ.दिलीप मोहिते, डॉ.नंदकिशोर कुमार यांनी आपली मते मांडली. प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी समारोप केला. प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ५६० जण सहभागी झाले होते.

 

Web Title: Workshop on New Impact of Foreign Policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.