जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 03:17 PM2019-05-18T15:17:37+5:302019-05-18T15:18:39+5:30
जगाला फक्त बुद्धांचा शांती व अहिंसेचाच मार्ग वाचवू शकणार असल्याने, जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा आहे. गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी व्यक्त केले.
रावेर, जि.जळगाव : जगाला फक्त बुद्धांचा शांती व अहिंसेचाच मार्ग वाचवू शकणार असल्याने, जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा आहे. गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी कामगार नेते दिलीप कांबळे होते.
शहरातील तक्षशिला बुद्ध विहारात विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतमबुद्ध यांची २५६३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी पुष्पपूजा, द्वीपपूजा, धूपपूजा करून उपस्थित उपासकांना त्रिशरण पंचशील दिले तद्नंतर त्यांनी धम्मदेसना देतांना सांगितले की जगाला आता युद्ध नव्हे तर बुद्ध हवा आहे.या जगाला फक्त बुद्धांचा अहिंसेचा आणि शांतीचा मार्गचं वाचवू शकेल, असे स्पष्ट करून त्यांनी उपस्थितांना बुद्धांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास दिलीप कांबळे, जगदीश घेटे, महेंद्र गजरे, अॅड.योगेश गजरे, बाळू शिरतुरे, अशोक शिंदे, पंकज वाघ, महेश तायडे, प्रकाश महाले, जे.व्ही.तायडे, डी.डी.वाणी, बाळू रजाने, दीपक तायडे, सावन मेढे , आनंद जाधव, धनराज घेटे, राहुल गाढे, वामन तायडे, मुकुंद इंगळे, पुंडलिक कोंघे, दिलीप लहासे, विनोद तायडे, दशरथ घेटे, अनिल घेटे , राजू गजरे, साहेबराव कोंघे, संगीता घेटे, सरला रायमळे, सुनीता साबळे, सुमन कोंघे यांच्यासह अनेक उपासक उपस्थित होते.
प्रास्ताविक बाळू शिरतुरे यांनी केले. पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी समारोप केला.