जागतिक वन दिनी चाळीसगावचे ऑक्सिजन सेंटर सर्वसामान्यांसाठी होणार खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:46 PM2021-02-28T17:46:37+5:302021-02-28T17:46:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : तालुक्यातील वाघळी गावाचे सुपुत्र, भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्व. उत्तमराव ...

On World Forest Day, Chalisgaon Oxygen Center will be open to the public | जागतिक वन दिनी चाळीसगावचे ऑक्सिजन सेंटर सर्वसामान्यांसाठी होणार खुले

जागतिक वन दिनी चाळीसगावचे ऑक्सिजन सेंटर सर्वसामान्यांसाठी होणार खुले

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तमराव पाटील वनोद्यानातील कामांचा आमदार मंगेश चव्हाण यांनी आढावा...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : तालुक्यातील वाघळी गावाचे सुपुत्र, भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने भाजपा नेते व तत्कालीन वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी उत्तमराव पाटील वनोद्यान योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत स्व.उत्तमराव पाटील यांचा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथील बिलाखेड शिवारात ७ हेक्टर जागेत सन २०१६मध्ये वनोद्यान व हायटेक रोपवाटिका उभारण्यास सुरुवात करण्यात आली होती. या उद्यानाचे काम आता अंतिम टप्यात आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकतीच सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वनोद्यानाची पाहणी करत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. येत्या २१ मार्च या जागतिक वन दिनी हे वनोद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी विभागीय वन अधिकारी आय. सी. शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय साळुंखे यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

दर्जेदार व टिकाऊ कामांचा आग्रह...

उद्यानाला संरक्षण म्हणून जे जाळीचे कुंपण करण्यात आले आहे ते निकृष्ठ दर्जाचे असल्याने ठिकठिकाणी तुटले असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच यापूर्वी उद्यानाच्या सभोवताली कच्चा रस्ता तयार करण्यात आल्याने पुन्हा त्याच कामासाठी निधी खर्च करण्यात येत असल्याने सदर रस्ता अधिक टिकाऊ कसा होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना यावेळी चव्हाण यांनी दिल्या.

विसाव्यासाठी जागोजागी बैठक व्यवस्था

वनोद्यानात रनिंग ट्रॅक, पाण्याचा तलाव, ओपन जिम, नक्षत्र वन, आयुर्वेदिक गार्डन, आकर्षक बगीचा, विविध प्राण्यांचे पुतळे, दोन पॅगोडा, निसर्ग वाचन केंद्र, भव्य प्रवेशद्वार, विसाव्यासाठी जागोजागी बैठक व्यवस्था आदी कामे झाली असून काही सुरु आहेत. आगामी काळात होणारी कामे दर्जेदार व विहित वेळेत पूर्ण करावे, असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: On World Forest Day, Chalisgaon Oxygen Center will be open to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.