एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व

By admin | Published: January 3, 2017 06:01 PM2017-01-03T18:01:06+5:302017-01-03T18:01:06+5:30

. एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व येणार असल्याचे प्रतिपादन कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कैलास चंद्र शर्मा यांनी केले.

World leadership in India in the 21st Century | एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व

एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व

Next

ऑनलाइन लोकमत 
जळगाव, दि. 3 - जमीन, कामगार, भांडवल आणि नौसर्गिक साधन संपत्ती या गोष्टी देशाच्या विकासासाठी आवश्यक ठरतात. स्वातंत्रपूर्व काळात भारतातून मोठया प्रमाणात कच्च्या मालाची निर्यात करुन इतर देशांनी विकास केला. स्वातंत्र्यानंतर भारतात औद्योगिकीकरणाला प्रारंभ झाला. १९९० नंतर देशाचा विकास हा गुंतवणूक किती केली जाते यावर मोजला जाऊ लागला. एकविसाव्या शतकात भारताकडे जगाचे नेतृत्व येणार असल्याचे प्रतिपादन कुरुक्षेत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कैलास चंद्र शर्मा यांनी केले.
विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या झालेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन डॉ.शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी डॉ.शर्मा बोलत होते. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर स्पर्धेचे समन्वयक डॉ.ए.पी.डोंगरे, डॉ.एस.आर.चौधरी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.शर्मा म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारतात भौतिक आणि मानवी विकास आवश्यक आहे आणि त्यासाठी संशेधानाची गरज आहे.भौतिक आणि मानवी विकासातून देशाची प्रगती होत असते आणि त्यासाठी तरुणांच्या नवोन्मेष व नाविन्यपूर्ण अविष्काराची गरज असल्याचेडॉ.शर्मा म्हणाले. 
शाश्वत विकासाची गरज
या देशाची परंपरा नव्या शोधाच्या अविष्काराची आहे. नवे संशोधन करताना पुढच्या पिढीसाठी सुलभ असणारे हवे, आवाहन निर्माण करणारे नको, शाश्वत विकासाचे संशोधन व्हावे अशी अपेक्षा डॉ.शर्मा यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी सर्वसामान्य माणसाला, समाजाला आणि पयार्याने राष्ट्राला संशोधनाचा फायदा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. खान्देशातील विद्यार्थी ज्ञान आणि कौशल्यात मागे नाहीत असेही ते म्हणाले. प्रारंभ डॉ.एस.आर.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केले. डॉ.अजय सुरवाडे यांनी आभार मानले.
नाविन्यपूर्ण विषयांची हाताळणी
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पोस्टर व मॉडेल अत्यंत नाविण्यपूर्ण संशोधन सादर केले. गाईच्या गोमुत्रापासून रंगाचे आयुष्य वाढविणे, इंडस्ट्रिजमध्ये जल शुध्दीकरण, ई-कचरा व्यवस्थापन, मेंदुच्या लहरी, जमीनीतील पाण्याचे तपासणी,महिला सबलीकरण, सर्वोत्तम गुंतवणूक, शेती अनुदान, सकारात्मकता आणि नकारात्मकता, तर्क क्षमता व समस्या, अध्यापन पध्दती, खान्देशातील आदिवासींचे योगदान, ग्रामीण विकास, ऐतिहासिक स्थळांची जतन, पारंपारिक साधनांची जतन, स्वच्छ भारत अभियान, मोबाईल वापर परिणाम, , विमुद्रीकरण, हायब्रीड एसी युनिट, नॅनो तंत्रज्ञान, मोडी भाषा हस्ताक्षर पध्दती, वॉटर हिटर या विषयांवर मॉडेल मांडले.

Web Title: World leadership in India in the 21st Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.