गोवर, रुबेलाने वाढविली पालकांची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:57 PM2018-12-01T23:57:57+5:302018-12-01T23:58:24+5:30
लहान मुलांना इंजेक्शनची भीती
विजयकुमार सैतवाल
जळगाव : राष्ट्रीय कार्यक्रम असलेल्या गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेने लहान मुलांना इंजेक्शनची भीती असल्याने ते शाळेत जाण्यासाठी मागे-पुढे करीत आहे. या सोबतच या लसीकरणाच्या दुष्परिणामांबाबत वेगवेगळे संदेश फिरत असल्याने पालकांचीही चिंता वाढली आहे.
मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेचे जळगाव जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ८ लाख ५७ हजार ८४८ लाभार्थी असून त्यांना पाच आठवड्यात लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या लाभार्थींप्ांैकी ६४ ते ६४ टक्के लाभार्थी हे शालेय विद्यार्थी असून त्यांना शाळेतच लसीकरण केले जाणार आहे. तसेच उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण अंगणवाडी केंद्र व बाहय लसीकरण सत्रात केले जाणार आहे.
राज्यात काही ठिकाणी या लसीकरण मोहिमेसाठी पालकांकडून संमतीपत्र मागितले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या मुळे पालकांमध्ये अधिक चिंता आहे. शाळांकडून संमतीपत्र मागितले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी संमतीपत्राची आवश्यकता नसल्याचेही आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
जळगाव जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे आहेत. त्यांना लस देण्यासाठी ३ हजार ३८० शाळांमध्ये एकूण ४३६६ लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य असून नंतरच्या २ आठवडयात अंगणवाडी केंद्र व बाह्य लसीकरणाचे ३०३३ सत्र, दुर्गम अति जोखमीचा भागामध्ये एकूण १३५ सत्र व २४८३ संस्थेतील सत्र असे एकूण जिल्ह्यातील १० हजार १७ सत्रामध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे.
गोवर रुबेला लसीकरणाबाबत भीती असली तरी या मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपल्या ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुला व मुलींना गोवर रुबेलाची लस द्यावी, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
गोवर-रुबेला लसीकरणाबाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने ते बालरोग तज्ज्ञांकडे विचारणा करीत आहेत. अनेक पालकांनी याबाबत संमती दर्शविली असली तरी मुलांना लस दिली असल्याने पुन्हा द्यावी की नाही, या बाबत संभ्रमात आहेत. त्यात सोशल मीडियावर असणाºया वेगवेगळ््या संदेशांमुळे पालक भयभीत होत असल्याचे सांगितले जात आहे. हे लसीकरण केल्यानंतर कोणत्याही लसीकरणानंतर येणारा ताप येऊ शकतो अथवा पूरळ येऊ शकतात. मात्र पालकांनी त्याबाबत भीती बाळगू नये, असे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. ताप आल्यास औषधी देऊन तो कमी होऊ शकतो व पूरळ आल्यास त्यासाठी औषधोपचाराची आवश्यकता नसल्याचे बालरोग तज्ज्ञांचेही म्हणणे आहे