यावल येथे बिरसा मुंडा चित्ररथाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 09:52 PM2018-12-09T21:52:41+5:302018-12-09T21:54:07+5:30
यावल येथील महाविद्यालयात आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या चित्ररथाचे तसेच सीएम चषक व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावल, जि.जळगाव : येथील महाविद्यालयात आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या चित्ररथाचे तसेच सीएम चषक व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय अध्यक्षा मीना तडवी, पं. स. सभापती पल्लवी चौधरी, रावेर पं.स. सभापती माधुरी नेमाडे, प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन, संगायोचे चेअरमन विलास चौधरी, उज्जैनसिंग पाटील, जि.प.चे माजी सदस्य हर्षल पाटील उपस्थित होते. प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले की, तालुकास्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यामागे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशानेच या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. महात्मा गांधी, पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अपेक्षित असलेल्या ग्रामीण भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी भाजपा शासन कटिबद्ध असल्याचे सांगून त्या दृष्टीने मोदी शासन विविध संकल्पना राबत असल्याचे सांगितले.
स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या चित्ररथाचे पूजन करण्यात आले आहे.
चित्ररथामध्ये बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर विविध चित्रे रेखाटली आहेत. चित्ररथ आदिवासी भागासह तालुक्यात पाच दिवस भ्रमण करेल. यामुुळे आदिवासी युवकांना निश्चितच प्रेरणा मिळेले, अशी ग्वाही मान्यवरांनी दिली. यशस्वितेसाठी बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, बाळू फेगडे, लहू पाटील, व्यंकटेश बारी, स्रेहल फिरके, रीतेय बारी, मयुर राणे यांनी परिश्रम घेतले.