शेंदुर्णीच्या रथाचे जागेवरच पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 02:50 PM2020-11-29T14:50:33+5:302020-11-29T14:52:35+5:30

ग्रामदैवत व ग्रामवैभव रथाचे २७६व्या वर्षी संस्कृती व परंपरा जोपासत मोजक्या नागरिकांनी विधिवत जागेवरच पूजन ऐक्याची मांदियाळी जोपासले.

Worship of Shendurni's chariot on the spot | शेंदुर्णीच्या रथाचे जागेवरच पूजन

शेंदुर्णीच्या रथाचे जागेवरच पूजन

Next
ठळक मुद्देसंस्कृती व परंपरा जोपासत रथाची जागेवरच पूजन२७६ वर्ष : शासकीय आदेशांचे तंतोतंत पालन
ंदुर्णी, ता.जामनेर : येथे ग्रामदैवत व ग्रामवैभव रथाचे २७६व्या वर्षी संस्कृती व परंपरा जोपासत मोजक्या नागरिकांनी विधिवत जागेवरच पूजन ऐक्याची मांदियाळी जोपासले. महाराष्ट्रात खानदेशचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेंदुर्णी येथे संत कडोजी महाराजांनी सुरू केलेला रथोत्सव, त्यांचे आठवे गादी वारस हभप शांताराम महाराज भगत शारदा भगत, नगराध्यक्षा विजया खलसे, अमृत खलसे, नगरसेविका वृषाली गुजर, योगेश गुजर, रजनी जोहरे, पंडितराव जोहरे यांच्या हस्ते परंपरेनुसार विधिवत पूजन झाले. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल खताळ, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, जि.प.चे माजी सदस्य संजय गरुड, पं.स चे माजी उपसभापती सुधाकर बारी, सागरमल जैन, जिनिंग प्रेसिंगचे संचालक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवळे, संदीप चिडे, डॉ.सागर गरुड, नारायण गुजर, कडोबा माळी, विजय सोनार, गजानन सुतार, नारायण कुमावत, वसंत जावळे, शिवाजी भगत उपस्थित होते. विधिवत पूजन ब्रह्मवृंद भूषण देवकर अरुण जोशी, सुनील पाठक, तुषार पिसे, बारकू मनोज जोशी आदींनी केले. खान्देशच्या प्रतिपंढरपूर शेंदुर्णी पुण्यपावन नगरीत रथोत्सव आला. जळगाव, धुळे, बुलढाणा जिल्ह्यातून सासरी गेलेल्या मुली व माहेरी गेलेल्या सुना धार्मिक परंपरा असलेल्या रथोत्सवासाठी घरी येतात. परंतु यावर्षी रथ मार्गाने फिरणार नसल्याने झेंडू, शेवंती व गुलाबाच्या फुलांनी फुलांनी सजवलेल्या रथाचे जागेवरच पूजन करून केले.

Web Title: Worship of Shendurni's chariot on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.