खान्देशातील ८ बसस्थानकांवर सुविधांचे टायर पंक्चर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 04:54 PM2023-10-11T16:54:38+5:302023-10-11T16:55:14+5:30
बहुतांशी ‘सपास’ : स्वच्छतेसह शौचालयांमध्ये घाण, समितीच्या पाहणीत गंभीर गोष्टी उघड
कुंदन पाटील
जळगाव : बसस्थानक परिसर, शौचालय, स्वच्छता आणि प्रवाशी अभियानाच्या परीक्षेत खान्देशातील ८ बसस्थानक नापास ठरले आहेत.तीनही जिल्ह्यातील बहुतांशी बसस्थानक सपास ठरल्याने जळगाव व धुळे विभागाचे लक्तरे वेशीवर टांगले गेले आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १५ मे ते १५ जुन या कालावधीत बसस्थानकांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविली होती.बसस्थानकावरील प्रसाधनगृहांची स्वच्छता, रंगरंगोटी इत्यादींकडे प्राधान्याने लक्ष पुरवावे. महिला प्रवाशांना प्रसाधनगृहाचा वापर करताना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये याची काळजी घेण्यासंदर्भात आदेश काढण्यात आले होते. त्याच्या निरीक्षणासाठी राज्यस्तरीय समितीही दाखल झाली होती. या समितीने १०० गुणांची परीक्षा घेतली. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात जळगाव ध धुळे विभागातील बहुसंख्य बसस्थानकांवर प्रचंड गैरसोयी असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
जळगाव, धुळ्याला ‘अ’ श्रेणी
जळगाव, धुळे, चाळीसगाव, शिरपूर, अमळनेर, चोपडा, जामनेर, भुसावळ, दोंडाईचा, नंदुरबार बसस्थानकाने या मोहिमेत ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. या सर्वच बसस्थानकांना ६० ते ८० दरम्यान गुण मिळाले आहेत.
तुम्ही पास...आम्ही नापास
एकीकडे १० बसस्थानक ‘अ’ श्रेणीत असताना ८ बसस्थानक मात्र नापास ठरले आहेत.१०० पैकी ३५ गुण उत्तीर्ण होण्याची पात्रता लावल्यास तळोदा, देवपूर (धुळे), चिमठाणे, पिंपळनेर, जळगाव शहर, पाळधी, अडावद बसस्थानक मात्र नापास झाले आहेत.
बसस्थानक-गुण
अक्कलकुवा-३९
तळोदा-२६
दोंडाईचा-७७
धुळे-५८
देवपूर-२९
नंदुरबार-६०
नवापूर-६५
शहादा-४३
धडगाव-१४
शिंदखेडा-६३
चिमठाणे-२२
शिरपूर-५७
साक्री-४७
पिंपळनेर-२४
अमळनेर-६२
पारोळा-३६
एरंडोल-५९
धरणगाव-३६
चाळीसगाव-५९
चोपडा-७७
अडावद-३०
जळगाव शहर-२६
जळगाव-५०
पाळधी-२९
जामनेर-६१
पाचोरा-५४
भडगाव-३६
भुसावळ-४९
मुक्ताईनगर-५१
बोदवड-४६
यावल-५३
फैजपूर-४२
रावेर-५०
सावदा-३५