लेखक डॉ.तेजपाल चौधरी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:44+5:302021-04-18T04:15:44+5:30
जळगाव : हिंदीतील प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक डॉ.तेजपाल चौधरी (वय ८५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते मू.जे. ...
जळगाव : हिंदीतील प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक डॉ.तेजपाल चौधरी (वय ८५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते मू.जे. महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पहिल्या अध्ययन मंडळाचे अध्यक्ष म्हणून, तसेच तौलनिक भाषा विभागाचे पहिले प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
प्रा.तेजपाल चौधरी हे मूळचे हरियाणातील होते. मात्र, त्यांचे शिक्षण मेरठला झाले. त्यानंतर, त्यांनी बरीच वर्षे जळगावच्या मू.जे. महाविद्यालयात शिक्षण घेतले. जळगाव आकाशवाणीवरून हिंदी नाटके प्रसारित होण्यास त्यांच्यामुळेच सुरुवात झाली होती. त्यांचे संस्कृत भाषेवरही प्रभुत्व होते. त्यांच्यापश्चात मुलगा, सून, नातवंडे, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
त्यांनी भाषा विज्ञानावर पुस्तके लिहिली. एम.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकांचा उपयोग होतो, तसेच त्यांचा ‘स्वाती के बुंद’ हा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे.