महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 09:32 PM2021-05-25T21:32:06+5:302021-05-25T21:32:49+5:30

महसुलाच्या पथकातील तलाठी गणेश महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा निषेध व्यक्त करत तलाठी संघाने लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे.

Writing strike of revenue employees | महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

Next
ठळक मुद्दे तलाठ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध, आरोपीला अटक करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यातील गंगापुुरी येथे अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी गेलेल्या महसुलाच्या पथकातील तलाठी गणेश महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा निषेध व्यक्त करत अमळनेर तालुका तलाठी संघाने लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे.

तलाठी संघाने प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ याना निवेदन दिले आहे. गुन्हा दाखल होऊन दोन दिवस झाले तरी गुन्ह्यातील आरोपीस अटक केलेली नाही, त्यामुळे आरोपीस अटक होईपर्यंत कोविडवगळता व नैसर्गिक आपत्ती वगळता इतर कामांसाठी लेखणीबंद आंदोलन सुरू राहील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना अध्यक्ष गणेश राजाराम महाजन, उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, कार्याध्यक्ष स्वप्नील कुलकर्णी, चिटणीस मुकेश देसले, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पवार, सहचिटणीस पिंटू चव्हाण, ऑडिटर वाय. आर. पाटील व तलाठी उपस्थित होते.

Web Title: Writing strike of revenue employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.