कामगारांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:57+5:302021-06-22T04:12:57+5:30

न्हावी, ता. यावल : मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कामगार वर्गाच्या विविध मागण्यांसंदर्भात 'वंचित बहुजन आघाडीच्या' नेतृत्वात सोमवारी न्हावी येथे ...

Written assurance regarding workers' demands | कामगारांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन

कामगारांच्या मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन

Next

न्हावी, ता. यावल : मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कामगार वर्गाच्या विविध मागण्यांसंदर्भात 'वंचित बहुजन आघाडीच्या' नेतृत्वात सोमवारी न्हावी येथे ठिय्या आंदोलन केले गेले. त्यास संचालक मंडळातर्फे सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, कामगारांच्या मागण्या लवकरच पूर्ण करू असे त्यांनी लेखी आश्वासन दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

न्हावी मार्ग फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना हा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद पडलेला आहे. त्यामुळे कामगार वर्गाचा रोजगार गेला. त्याचा सुमारे चाळीस महिन्यांचा पगार थकीत आहे. पीएफ रक्कमही भरली जात नव्हती. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणीही थकीत आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कारखान्याचे चेअरमन यांच्या निवासस्थानी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यास प्रतिसाद देत संचालक मंडळातर्फे कामगार वर्गाच्या मागण्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडून लवकरच पूर्तता करू, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे, तर विनोद सोनवणे यांनी सांगितले की, जोपर्यंत मागण्या पूर्ण केल्या जात नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही.

हे आंदोलन विनोद सोनवणे (जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) व तालुकाध्यक्ष मनोज कापडे यांच्या नेतृत्वात पार पडले. याप्रसंगी प्रमोद इंगळे, दिनेश इखारे, मनोज कापडे, बाळू शिरतुरे, दीपक मेघे, रफिक बेग, सचिन बाऱ्हे, बालाजी पठाडे, भगवान मेघे, छोटू गवळी, सोनू वाघुळदे, विद्यासागर खरात, देवदत्त मकासरे, बंटी सोनवणे, कांतिलाल गाढे, कुणाल सुरडकर, विनोद तायडे, अर्जुन वाघ, सुरेश अटकाळे, गोलू अवसरमल, संम्यक इंगळे, अजय तायडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर कामगार गिरीष कोळंबे, युनियन माजी अध्यक्ष दामोदर कोळंबे, योगेश होले, कुमार पाटील, हमीद शाह, वसंत चौधरी, अरुण पाटील, मनमोहन महाजन, भानुदास पाटील, पुंडलिक माळी, जीवन फेगडे, शरद जावळे, राजेंद्र सोनवणे, सुनील अडकमोल, सुनील कोष्टी, संजय कोलते, आदी कामगारांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Written assurance regarding workers' demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.