चुकीची माहिती देवून शिक्षकांनी केली बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 04:46 PM2018-05-20T16:46:56+5:302018-05-20T16:46:56+5:30
शिक्षकांविरुद्ध शिक्षकांचीच तक्रार
Next
ठळक मुद्देन्याय मिळण्याची मागणीसीईओंना देणार निवेदन
ज गाव : जि.प.शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात शिक्षकच शिक्षकांविरुद्ध तक्रारी घेवून शनिवारी जिल्हा परिषदेत दाखल झाले. ऑनलाईन बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरुन फसवणुकीचा प्रकार केल्याने अन्य शिक्षकांवर अन्याय झाला असल्याची कैफीयत या शिक्षकांची आहे. हे जळगाव तालुक्यातील सुमारे 35 ते 40 अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षिका आपले गा:हाणे मांडण्यासाठी निवेदन घेवून जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी हे कामानिमित्त बाहेर गेल्याने सोमवारी येवून निवेदन देण्याचा निर्णय या शिक्षकांनी घेतला आहे. काही शिक्षकांनी समायोजन बदलीत गावांमधील अंतर जास्त दाखविले आहे. याची शहानिशा न करात बदल्या झाल्याने अन्य बदलीस हक्कदार शिक्षकांवर अन्याय झाला आहे, असे या शिक्षकांचे म्हणणे आहे. या शिक्षकांसोबत जिल्हा परिषदेत कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे, तालुकाध्यक्ष नितीन सोनवणे, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, सचिव निळकंठ चौधरी, प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती राणे आदींनी उपस्थिती दिली होती.