वयाच्या १९ व्या वर्षी लिहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:15 AM2021-05-17T04:15:08+5:302021-05-17T04:15:08+5:30
फोटो : 10.09 वाजेचा मेल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या ...
फोटो : 10.09 वाजेचा मेल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात. त्यानांच यश प्राप्त होते. यश खडतर प्रयत्नांमधून मिळाले, तर त्याचा आनंद काही ओरच असतो. अशाच मनोवृत्तीवर ठाम राहून मू.जे. महाविदयालयाच्या एफवायबीएससीचा विदयार्थी ओमप्रकाश अटाले याने केवळ १९ व्या वर्षीच न्यूरोबायोलॉजीवरील "नयूरोबायोलॉजी ऑफ माईल्ड ॲण्ड सिवीयर सॅकीयाट्रिक डिसऑर्डरस" नावाने पुस्तक लिहिले. नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
ओमप्रकाश आटाळे या विद्यार्थ्यांचे हे तिसरे पुस्तक आहे. दहावीत असताना त्याने पहिले पुस्तक लिहिले होते. तर अकरावीत असताना दुसरे पुस्तक लिहिले. पहिल्या पुस्तकात हॅड्रोजन सोडून पहिल्या ६ एलिमेंट्ससाठी श्रोडिंगर इकवेशन लिहले आहे. पुस्तकाचे नाव श्रोडिंगर इकवेशन फॉर एलमेंट्स भाग १ आहे. बीएससी, एमएससी तसेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मेथडच्या माध्यमातून गणित सोप्या पध्दतीतून सोडविण्यास मदत होईल, या उद्देशातून चार महिने गणिताच्या विविध प्रकारांवर संशोधन करून त्याने अकरावीमध्ये दुसरे पुस्तक लिहले. दुसऱ्या पुस्तकाचे नाव ''मेट्रीक ट्रान्सफॉरमेशन अॅण्ड इटस् कनेक्श्न'' असे आहे.