ताटातील वांगे शेताच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 09:25 PM2018-05-03T21:25:09+5:302018-05-03T21:25:09+5:30
भडगाव तालुक्यात वांग्याचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात
अशोक परदेशी / आॅनलाईन लोकमत
भडगाव, दि.३ : वांग्याच्या दरात होणारी घसरण, शेत मजुरांची टंचाई आणि औषधांची फवारणी करून देखील किडीचा होणारा प्रार्दुभाव या तिहेरी संकटामुळे भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली वांगी बांधावर फेकण्यास सुरुवात केली आहे. या संकटामुळे पहिल्यांदाच नांगर फिरविण्याची नामुष्की अनेक शेतकºयांवर ओढविली आहे.
भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील प्रमोद धर्मा पाटील या शेतकºयाने एक एकर वांगे पिकाची गेल्या नोव्हेंबर महिन्यात लागवड केली. रासायनिक खते, औषध फवारणी, महागडी मजुरी, भर उन्हाळ्यात जिवाचे रानं करुन मेहनतीने वांगे पिकाचा मळा फुलविला. सुरुवातीचे काही दिवस २० रुपये किलो भाव मिळाला. त्यानंतर मात्र भावात घसरण होऊन ५० ते १०० रुपये कॅरेट असा भाव आहे. ४ ते ५ रुपये प्रति किलो भाव वांग्याला मिळत आहे.
वांगे तोडणीसाठी १५०० रुपये, वाहतूक ६०० रुपये येत असताना विक्रीतुन केवळ १५०० रुपये मिळत आहे. वांग्यांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. सध्या वांग्यात अळ्या तयार झाल्याने शेतकºयांकडून औषध फवारणी सुरु आहे. त्यातच वांगे पिकाला भाव नाही. मजुर वेळेवर मिळत नाही. वांगे किड औषधीचा मारा करुनही थांबत नाही. अशा तिहेरी दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकºयाला वांगे तोडून बांधावर फेकावे लागत आहे.
तालुक्यातील टोणगाव शिवारातील इंदल लालचंद परदेशी व संजय लालचंद परदेशी यांनी एक एकरात वांगे पिकाची लागवङ केली. मात्र उत्पन्नाचा खर्चही निघत नसल्याने त्यांनी अर्धा एकर वांगे मळयावर नांगर फिरविला आहे.
मी एक एकर वांगे पिकाची लागवड केली होती. मात्र बाजारभाव फक्त ४ ते ५ रुयये प्रति किलो भाव मिळत आहे. कमी भाव, मजुरीचे वाढलेले दर परवडत नाही. त्यामुळे वांगे पिकावर नांगर फिरविण्याच्या तयारीत आहोत.
-प्रमोद धर्मा पाटील, वांगे उत्पादक शेतकरी, निंभोरा.