यावल न्यायालयाची फसवणूक, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:52 IST2020-12-10T13:44:23+5:302020-12-10T13:52:11+5:30
यावल पोलिसात आरोपी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल न्यायालयाची फसवणूक, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल
यावल : येथील न्यायालयाचा कर्मचारी प्रत्यक्षात न्यायालयात हजर नसतानासुद्धा त्याने कार्यालयीन हजेरीपटावर खाडाखोड करून हजेरीपटावर सह्या करून कार्यालयाची फसवणूक केली. याप्रकरणी यावल पोलिसात आरोपी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल दिवाणी न्यायालयातील लिपिक विजय पंढरीनाथ सूर्यवंशी हे १९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत न्यायालयात हजर नव्हते किंवा ते कार्यालयीन वेळेत इतरत्र हजर नसतानासुद्धा त्यांनी कार्यालयातील हजेरीपटावर खाडाखोड केली. हजेरीपटावर सह्या करून कार्यालयाची फसवणूक केली. म्हणून यावल न्यायालयाचे न्यायाधीश जगताप यांनी यावल पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजमल पठाण हे करीत आहेत.