यावल पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कारवाईच्या आश्वासनानंतर मध्यरात्री आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:57 PM2019-07-03T12:57:56+5:302019-07-03T12:58:27+5:30
सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी क्लिप टाकल्याने संताप
यावल, जि. जळगाव : सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी क्लिप टाकल्याने येथील एका गटाच्यावतीने संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी यावल पोलीस ठाण्यात दोन तास शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्री जमाव पोलीस ठाण्यातून घरी परतला. विषेष म्हणजे मंगळवारी सायंकाळी पोलीस ठाण्याच्यावतीने सोशल मीडियावरील अफवा, धार्मिक भावना दुखावणा-या पोस्टमुळे शहरात तणाव निर्माण होवू नये म्हणून सर्वधर्मीय नागरिकांची शातता समितीची बैठक घेतली. बैठक संपून दोन तासही होत नाही, तोवर ही घटना घडली आहे.