यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:58 PM2019-11-30T12:58:34+5:302019-11-30T13:00:50+5:30

जात प्रमाणपत्र सादर न केल्याने झाली कारवाई

Yaval town president Surekha Koli is ineligible, collectors' decision | यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Next

जळगाव : जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा शरद कोळी (शिवसेना) यांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अपात्र घोषित केले आहे. कोळी यांचा अजून दोन वर्षांचा कार्यकाळ बाकी होता.
२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुरेखा कोळी या निवडून आल्या होत्या. त्यांनी ही निवडणूक महिला राखीव अनुसूचित जमाती संवर्गातून लढविली होती. निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्यांनी जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. ते त्यांनी न दिल्याने ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, शासनाने २७ सप्टेंबर २०१८च्या अध्यादेशानुसार राज्यातील सर्व संवर्गातून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी १५ दिवसाच्या आत जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी यावल मुख्याधिकाºयांना नगराध्यक्षांकडून जात प्रमाणपत्र सादर केले किंवा नाही याबाबत विचारणा केली होती. त्यांनी नगराध्यक्षा कोळी यांनी जात प्रमाणपत्र सादर न केल्याचा अहवाल दिला होता.
दरम्यान, आपण अपात्र ठरू शकतो, हे लक्षात आल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल करीत संरक्षण मिळविले होते. यानंतर खंडपीठाने कोळी यांच्या अर्जावर सखोल सुनावणी करीत कोळी यांना दिलेले संरक्षण काढून घेतले. भाजपचे नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांना अपात्र ठरविण्याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली होती. मुख्याधिकाºयांचा आलेला अहवाल, नगरसेवक पाटील यांनी केलेली तक्रार यावर सुनावणी होऊन नगराध्यक्षा कोळी यांना जिल्हाधिकाºयांनी अपात्र ठरविले, अशी माहिती जिल्हा विधी अधिकारी अ‍ॅड. हारूल देवरे यांनी दिली. नगराध्यक्षा कोळी यांच्यातर्फे अ‍ॅड.वसंत भोलाणकर यांनी बाजू मांडली.

Web Title: Yaval town president Surekha Koli is ineligible, collectors' decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव