यावलला संध्या महाजन सभापतीपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 12:11 AM2017-03-15T00:11:06+5:302017-03-15T00:11:06+5:30
काँग्रेसचा टेकू : भाजपाला बंडखोरीचा फटका, ईश्वरचिठ्ठीत काँग्रेसचा उपसभापती
यावल : पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपा सदस्या संध्या महाजन यांनी बंडखोरी करत काँग्रेसच्या सहकार्याने व नशिबाच्या जोरावर सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे भाजपा समर्थक अपक्ष उमेदवार पल्लवी चौधरी यांना पराभव स्वीकारावा लागला़
भाजपाच्या संध्या महाजन ईश्वर चिठ्ठीने सभापतीपदी विराजमान झाल्या तर दुसरीकडे उपसभापतीपदावरही काँग्रेसचे उमाकांत रामराव पाटील यांचीही ईश्वर चिठ्ठीने निवड झाल्याने काँग्रेसचे दैव बलवत्तर ठरले आह़े
दरम्यान, भाजपाने पल्लवी चौधरी यांच्या नावाचा व्हीप काढला होता. मात्र महाजन यांनी तो व्हिप झुगारत काँग्रेसच्या सहकार्याने उमेदवारी दाखल केली, हे विशेष !
ईश्वर चिठ्ठीने झाला फैसला
पाच सदस्य निवडून आलेल्या भाजपाने अपक्ष उमेदवार पल्लवी चौधरी यांना सभापतीपदाची संधी देऊ केली होती, तर संध्या महाजन यांनी त्यास विरोध दर्शवला होता. त्यांनी भाजपाशी बंडखोरी करीत काँग्रेसच्या चार सदस्यांना सोबत घेत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपातर्फे पल्लवी चौधरी यांनी अर्ज दाखल केला़ हात उंचावून झालेल्या मतदानात दोघांनाही सम-समान म्हणजे प्रत्येकी पाच मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीचा निर्णय झाला़ योगेश राजेंद्र पाटील (वय 10) या बालकाने काढलेल्या चिठ्ठीत संध्या महाजन यांचे नाव आल्याने त्यांची सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली़
उपसभापतीपदासाठी
काँग्रेसला लागली लॉटरी
उपसभापतीपदासाठी तीच प्रक्रिया राबविण्यात आली.़ भाजपातर्फे लताबाई कोळी, तर काँग्रेसतर्फे उमाकांत रामराव पाटील यांना समसमान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आली़ त्यातही काँग्रेस उमेदवार उमाकांत पाटील यांना संधी मिळाली़ पिठासीन अधिकारी तहसीलदार कुंदन हिरे होते. गटविकास अधिकारी वाय. पी. सपकाळे, नायब तहसीलदार सुनील समदाने यांनी सहकार्य केले. निवडीनंतर सभापती, उपसभापती यांचा गौरव करण्यात आला.
काँग्रेसचा जल्लोष
काँग्रेसने दोन्ही जागांवर विजय मिळाल्याने समर्थकांनी जोरदार घोषणा देत जल्लोष केला व विजयी मिरवणूक काढली. त्यानंतर येथील जिनिंग प्रेसींग सोसायटीच्या सभागृहात विजयी सभा घेतली. प्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, उपस्थित होते. निरीक्षक बळीराम हिरे व सहका:यांनी चोख बंदोबस्त राखला़ (वार्ताहर)
तालुका सभापती उपसभापती
जळगाव यमुनाबाई रोटे भाजप शीतल पाटील शिवसेना
चोपडा आत्माराम म्हाळके भाजप मच्छिंद्रनाथ पाटील शिवसेना
अमळनेर वजाबाई भिल भाजप त्रिवेणीबाई पाटील भाजप
पारोळा सुनंदा पाटील राष्ट्रवादी अशोक पाटील राष्ट्रवादी
एरंडोल रजनी सोनवणे शिवसेना विवेक पाटील शिवसेना
धरणगाव मंजूषा पवार शिवसेना प्रेमराज पाटील शिवसेना
जामनेर संगीता पिठोडे भाजप गोपाल नाईक भाजप
भुसावळ सुनील महाजन भाजप मनीषा पाटील भाजप
बोदवड गणेश पाटील भाजप दीपाली राणे भाजप
मुक्ताईनगर शुभांगी भोलाणे भाजप प्रल्हाद जंगले भाजप
रावेर माधुरी नेमाडे भाजप अनिता चौधरी भाजप
यावल संध्या महाजन काँग्रेस पुरस्कृत उमाकांत पाटील काँग्रेस
चाळीसगाव स्मितल बोरसे भाजप संजय पाटील भाजप
पाचोरा सुभाष पाटील भाजप अनिता पवार काँग्रेस
भडगाव हेमलता पाटील शिवसेना प्रताप सोनवणे राष्ट्रवादी
भाजपा समर्थ व काँग्रेसमध्ये संघर्ष
4यावल येथे काँग्रेसच्या वाहनात संध्या महाजन आल्या असता सभागृह आवारात वाहनास जाऊ देण्यास भाजपा समर्थकाकडून मज्जाव करण्यात आला़ या प्रसंगी पोलीस व समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे.
आपण भाजपाच्याच सदस्या आहोत़ अपक्ष पल्लवी चौधरी यांची उमेदवारी मला मान्य नसल्याने पं.स.वर भाजपाची सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेसचे सहकार्य घेण्यात आल़े मी घेतलेल्या निर्णयास ईश्वरानेही साथ दिली़
-संध्या महाजन,
नूतन सभापती यावल पं़स़