यावलचे ज्ञानेश्वर महाजन पोलीस पाटील संघटनेवर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 09:42 PM2018-11-11T21:42:07+5:302018-11-11T21:42:55+5:30

जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन या तीन जिल्ह्यांच्या पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील ज्ञानेश्वर महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Yaval's Dnyaneshwar Mahajan Police is unanimously elected on the organization | यावलचे ज्ञानेश्वर महाजन पोलीस पाटील संघटनेवर बिनविरोध

यावलचे ज्ञानेश्वर महाजन पोलीस पाटील संघटनेवर बिनविरोध

Next
ठळक मुद्देगेल्या १२ वर्षांपासून ज्ञानेश्वर महाजन जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरतकार्याची दखल घेत त्यांना आता जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांची जबाबदारी

यावल, जि.जळगाव : जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन या तीन जिल्ह्यांच्या पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील ज्ञानेश्वर महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संघटनेचे राज्याध्यक्ष भिकाजी पाटील यांच्या उपस्थितीत ही निवड झाली आहे. गेल्या १२ वर्षांपासून ज्ञानेश्वर महाजन जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्याची दखल घेत त्यांना आता जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांची जबाबदारी राज्याध्यक्ष पाटील यांनी दिली आहे.
याप्रसंगी गोपाळ पाटील, प्रदीप पाटील, मोहन मेढे मुक्ताईनगर, लक्ष्मीकांत लोहार विनोद पाटील, चंदू इंगळे, किरण पाटील यावल, विजय शिरसाट, दिनेश पाटील, बापूसाहेब पाटील ,भागवत विनायक पाटील एरंडोल, कुमावत पाटील पाचोरा, माडोळे पाटील, विनायक पाटील चाळीसगाव, प्रल्हाद पाटील पारोळा, नरेंद्र शिंदे, भिका पाटील धरणगाव, प्रवीण पाटील, श्रीकृष्ण पाटील, जीतू पाटील जळगाव, रवी पाटील, रतन सिंग पाटील भुसावळ आदी उपस्थित होते.


 

Web Title: Yaval's Dnyaneshwar Mahajan Police is unanimously elected on the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.