यावल शहर हगणदरीमुक्त
By admin | Published: June 5, 2017 05:26 PM2017-06-05T17:26:04+5:302017-06-05T17:26:04+5:30
शहरात आनंद : केंद्रीय समितीचे पालिका प्रशासनाला पत्र
Next
ऑनलाईन लोकमत
यावल,दि.5- शहरातील विविध शालेय संस्था, विविध रस्त्यावरील हगणदारी परीसरासह सार्वजनिक ठिकाणांची केंद्रीय गुणनियंत्रण समितीतर्फे तृतीयपक्ष (थर्डपार्टी) निरीक्षणाअंती शहर 100 टक्के हगणदारीमुक्त झाल्याचा अहवाल केंद्रीय समितीने शासनाकडे सादर केला आहे. सोमवारी समितीच्या अहवालाची प्रत प्राप्त होताच नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी नगरसेवकांच्या बैठकीत याबाबतची माहीती दिली. केंद्रीय समितीने शिफारस केल्याने शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीसह पारीतोषिकासाठी पालिका पात्र ठरल्याचे त्यांनी प्रसंगी सांगितले.
भारत स्वच्छ अभियानांतर्गत केंद्रीय गुणनियंत्रण भारत सरकार (क्युसीआय)तर्फे नवी दिल्लीच्या गुण नियंत्नक विभागाचे वरिष्ठ अधिकारी रवी पवार, कनिष्ठ अधिकारी विशाल सोरडे या दोन सदस्यीय समितीने 2 जून रोजी शहरात एसटी बसने येवून शहराच्या विविध ठिकाणांची थर्डपार्टी (टीपीआय.) निरीक्षण केले होते. यात शहरातील इंदिरा गांधी गल्र्स उर्दू हायस्कूल, जि.प. प्राथमिक शाळा, व्यापारी संकूल, बाजार समिती, बससथानक परीसरासह शहरातील विविध वस्त्यांमध्ये जावून वैयक्तीक शौचालयांसह सार्वजनिक शौचालयांची शिवाय नदी भागासह शहरातील गरीब वस्त्यांमध्ये पाहणी केली होती.