एका वर्षात ७० पोलिसांवर कारवाईची कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:48 PM2020-03-16T12:48:17+5:302020-03-16T12:48:50+5:30
जळगाव : अवैध धंदे चालकांशी सलगी, अवैध धंद्यावर धाड टाकून कारवाईतील जप्त रक्कम आपसात वाटून घेणे,राजकीय लोकांच्या संपर्कात रहाणे, ...
जळगाव : अवैध धंदे चालकांशी सलगी, अवैध धंद्यावर धाड टाकून कारवाईतील जप्त रक्कम आपसात वाटून घेणे,राजकीय लोकांच्या संपर्कात रहाणे, कैद्यांना मदत करणे व लाचखोरी यासारख्या विविध प्रकारच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या ७० पोलिसांवर वर्षभरात कारवाईची कुºहाड कोसळली आहे. त्यात ३६ जणांना पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहे तर ३४ जणांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ही धडक कारवाई केली आहे.
गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच पोलीस वर्धापनदिनानिमित्त आयोजित शस्त्र प्रदर्शनात पोलिसांच्या रखवालीतून ३८ स्ट्रमरुगल रिव्हॉल्वरची चोरी झाली होती. तेव्हा तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी विजय अभिमन शिंदे व योगेश श्रीराम मासरे या दोन पोलिसांना हलजर्गीपणाचा ठपका ठेवून निलंबित केले होते.
त्याआधी अवैध धंद्याची वसुली करणाऱ्या जिल्ह्यातील ७९ पोलीस कर्मचाऱ्यांना शिंदेंनी मुख्यालयात नवचैतन्य कोर्ससाठी जमा केले होता. फेब्रुवारी महिन्यात शिंदे यांची बदली झाली. त्यांच्या जागी डॉ.पंजाबराव उगले रुजू झाले.
उगले यांनी २ एप्रिल रोजी पहिलच विकेट पाडली ती भुसावळचा पोलीस कर्मचारी कुणाल विठ्ठल सोनवणे याची. नांदुरा पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल झाल्याने सोनवणे याला निलंबित करण्यात आले.
चुकीला माफी नाहीच...
उगले यांच्या काळातच सर्वाधिक कर्मचारी निलंबित व मुख्यालयात जमा झाले आहेत. कोणी चूक केली तर त्याला माफी नाहीच. कारवाई होऊ नये म्हणून अनेक कर्मचाºयांनी वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा दबाव झुगारुन दोषी पोलिसांवर कारवाई करुन कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा संदेश दिला. चांगले काम करणाºया कर्मचाºयांचा गौरव तसेच बदल्यामंध्ये पारदर्शकता ठेवली.
लाचखोरीत अडकले पाच कर्मचारी
भुसावळ बाजारपेठचे छोटू माणिक वैद्य, मेहुणबारेचे विजय जाधव, शालिग्राम कुंभार, पहूरचे गजानन पवार व रामानंद नगरचे संभाजी पाटील या चार पोलिसांना लाचखोरीचे गुन्हे दाखल झाल्याने सेवेतून निलंबित करण्यात आले. प्रशांत पाटील याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यालाही निलंबित करण्यात आले. शिवाजी ढबू बाविस्कर, तुषार मधुकर साळुंखे, संतोष पारधी व हितेश बेहरे या चौघांनी अवैध धंद्यावर छापा टाकून कारवाईमधील रक्कम सरकारकडे जमा न करता आपसात वाटून घेतल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले.
चुकीचे काम करणारे अधिकारी असो की कर्मचारी कारवाई होणारच. चांगले काम करणाºयांच्या पाठीशी राहून त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करतो. प्रत्येकाने जबाबदारी, कर्तव्याला प्राधान्य देऊन प्रामाणिकपणे काम करावे हीच अपेक्षा आहे. आपण जनतेचे नोकर आहोत,त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. जनेतत चांगली किंवा वाईट प्रतिमा तयार करणे आपल्याच हाती आहे. त्यामुळे चुकीचे काम खपवून घेतले जाणार नाही.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक