यंदा खान्देश भारनियमनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 12:37 PM2020-03-05T12:37:53+5:302020-03-05T12:38:07+5:30

जळगाव : पंधरा दिवसांपासून थंडी गायब होताच, घरोघरी वातानुकुलीत उपकरणे सुरु झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, महावितरणकडे सध्या ...

 This year, Khandesh is free of charge | यंदा खान्देश भारनियमनमुक्त

यंदा खान्देश भारनियमनमुक्त

Next

जळगाव : पंधरा दिवसांपासून थंडी गायब होताच, घरोघरी वातानुकुलीत उपकरणे सुरु झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. मात्र, महावितरणकडे सध्या स्थितीला महानिर्मितीकडून करण्यात आलेली विजेची उपलब्धता आणि काही खाजगी कंपन्यांकडून खरेदी करण्यात येत असलेल्या विजेमुळे यंदा जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा भारनियमन मुक्त राहील, अशी माहिती महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
उन्हाळ््याची चाहूल लागताच नागरिकांना भारनियमनाची चिंता सतावते. कारण उन्हाळ््यात विजेची मागणी दुपटीने वाढत असल्याने, विजेचा तुटवडा निर्माण होतो. अशा वेळेस शहरासह ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. मात्र, यंदा विजेची मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी महावितरणकडून जिल्ह्यात कुठेही भारनियमन लागू न करण्याबाबत नियोजन सुरु आहे. विशेषत: एप्रिल आणि ‘मे’ महिन्यात विजेची मागणी सर्वांत मोठी असल्याने, या काळात भारनियमन होऊ नये, यासाठी महानिर्मितीसह खाजगी कंपन्यांच्याच्या प्रतिनिधींशी बैठका घेऊन, आतापासून नियोजन करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे अनेकवेळा कोळशाच्या टंचाईमुळेदेखील वीजेची उपलब्धता कमी होऊन, भारनियमनाला सामोरे जावे लागते. त्यादृष्टीने महानिर्मितीने आतापासूनच पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध करुन ठेवल्याने, यंदा खान्देश भारनियमुक्त राहणार असल्याचा दावा महावितरणतर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दोन ते तीन तास वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे़ या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी जिल्हाभरात सुरू असलेल्या वीजेच्या कामांमुळे वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे स्पष्ट केले़

सरासरी लागते ७७० ते ७८० मेगावॅट वीज
जळगाव परिमंडळात जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबारचा समावेश असून, या तिन्ही जिल्ह्यात सध्या स्थितीला दररोज सरासरी ७७० ते ७८० च्या घरात मेगावॅट वीज लागत आहे. धुळे व नंदुरबारच्या तुलनेने जळगाव जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र जास्त असल्याने सर्वांधिक ४०० मेगावॅट वीज जळगाव जिल्ह्यासाठी लागत आहे.

उन्हाळ््यात भारनियमन होऊन, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी महावितरणतर्फे विजेच्या पुरवठ्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा जळगाव परिमंडळात येणाºया जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबार या ठिकाणी भारनियमन होणार नाही.
-दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव.

Web Title:  This year, Khandesh is free of charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.