यंदाही चहार्डीवासीयांच्या मानगुटीवर पुराचा धोका

By Admin | Published: May 19, 2017 12:44 PM2017-05-19T12:44:09+5:302017-05-19T12:44:09+5:30

खासदार रक्षा खडसे यांनी बंधा:याची उंची कमी करण्याचे आश्वासन दिले होते.

This year, the risk of floods in Chhurdish's hometown | यंदाही चहार्डीवासीयांच्या मानगुटीवर पुराचा धोका

यंदाही चहार्डीवासीयांच्या मानगुटीवर पुराचा धोका

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 19 - तालुक्यातील  चहार्डी येथे असलेल्या कोल्हापुरी बंधा:यामुळे गेल्यावर्षी अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यावेळी भेटीसाठी आलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी बंधा:याची उंची कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यावर्षाचा पावसाळा सुरू होण्याची वेळ आली तरी बंधा:याची उंची कमी झाली नाही की पुरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे खासदारांचे आश्वासन हवेतच विरल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाही चहार्डीवासीयांच्या मानगुटीवर पुराचा धोका असल्याचे चित्र आहे.
चहार्डी येथे 1992  साली तत्कालीन नगरविकास मंत्री अरूणभाई गुजराथी यांच्याहस्ते व शेकडो पदाधिका:यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा सोहळा झाला होता. 90 लाख रूपये खर्चून हा बंधारा बांधला. मात्र त्यात अद्याप थेंबभरही पाणी अडलेले नाही. या बंधा:याचे काम पूर्ण झाल्यानंतरही  अजूनही बंधारा हस्तांतरणाच्या लाल फितीत  अडकलेला आहे.  लघुसिंचन विभागाने आमच्या ताब्यात अजूनही बंधारा हस्तांतरीत केला नसल्याचे  ग्रामपंचायतचे म्हणणे आहे. तर  बंधारा ग्रामपंचायतच्या ताब्यात दिल्याचे   लघुसिंचन विभागाचे म्हणणे आहे. या दोघांच्या वादात बंधा:यात पाणी तर अडविले गेलेच नाहीच. उलट बंधा:यात कचरा अडकून पावसाळ्यात तेथील पाणी गावात शिरते.
गेल्यावर्षी 9 जून 2016 रोजी झालेल्या पावसामुळे बंधा:यातील पाणी गावात शिरले होते. त्यामुळे  अनेकांचे संसार या पाण्यात वाहून गेले होते. त्यावेळी पहाणीसाठी आलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी बंधा:याची उंची कमी करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी बंधा:याची उंची कमी झालीच नाही. शिवाय नुकसानग्रस्तांनाही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे खासदारांचे आश्वासन हवेतच विरल्याची चर्चा आहे.

Web Title: This year, the risk of floods in Chhurdish's hometown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.