यंदा शिवजयंती साधेपणानेच साजरी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:43 AM2021-02-20T04:43:37+5:302021-02-20T04:43:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदा शहरात शिव जयंती साधेपणानेच साजरी करण्यात येणार असून मिरवणुक व इतर कार्यक्रमांचे आयोजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यंदा शहरात शिव जयंती साधेपणानेच साजरी करण्यात येणार असून मिरवणुक व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नसल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.
पत्रकार भवनात गुरूवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षांपर्यंत शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. मात्र यंदा पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे यंदा असे कार्यक्रम टाळण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ सर्वांना जाता येत नसल्याने त्याच्याजवळ एक लहान पुतळा ठेऊन पुजन करण्यात येणार आहे. तेथे देखील येणाऱ्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले जाणार आहे.’
यंदा देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेत या कार्यक्रमाचे नियोजन पुर्ण झाले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत या वर्षाची शिवजयंती साधेपणाने साजरी केली जाणार आहे. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.’ ते पुढे म्हणाले की, ‘शिवजयंती ते शिवराज्याभिषेक दिन या काळात पुढे नंतर हा सोहळा साजरा केला जाईल.’ यावेळी महापौर भारती सोनवणे, कैलास सोनवणे, राम पवार, शंभु पाटील, पुरूषोत्तम चौधरी उपस्थित होते.