यंदा दोन महिने अगोदरच दहावीचे पुस्तके बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:24 PM2018-04-05T18:24:36+5:302018-04-05T18:24:36+5:30

चाळीसगावच्या डॉ. पुर्णपात्रेंची सोनाली पुन्हा विद्यार्थ्यांच्या भेटीला. पुस्तकांच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ

This year, two-and-a-half-yearly books are available in the market | यंदा दोन महिने अगोदरच दहावीचे पुस्तके बाजारात

यंदा दोन महिने अगोदरच दहावीचे पुस्तके बाजारात

googlenewsNext
ठळक मुद्देपुस्तकांच्या किंमती २० टक्क्यांनी वाढल्याने खिशाचा भार वाढला आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रत्येक पुस्तकाची किंमत दहा ते वीस रुपयांनी वाढलीदहावीच्या नवीन अभ्यासक्रमात १७ वा धडा म्हणुन 'सोनाली' पुन्हा स्थान

जिजाबराव वाघ/ आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि.५ : दरवर्षी पुस्तकांसाठी प्रतीक्षा ही ठरलेली असते. इयत्ता आठवी पर्यंतची पुस्तके सर्व शिक्षा अभियानातर्गत मोफत मिळत असली तरी दहावीच्या नव्या पुस्तकांसाठी वाट पहावी लागते. यंदा मात्र दोन महिने अगोदरच दहावीची पुस्तके दुकानांवर उपलब्ध झाली आहेत. चाळीसगावचे प्राणीमित्र डॉ.वा.ग.पुर्णपात्रे यांच्या सोनाली पुस्तकातील एक उतारा (धडा) मराठीच्या कुमारभारती पुस्तकात समावेश केला गेला आहे. यावर्षी पुस्तकांच्या किंमती २० टक्क्यांनी वाढल्याने खिशाचा भार वाढला आहे.
दहावीची पुस्तके येत्या शैक्षणिक वषार्पासून बदलत आहे. त्यामुळे ती कधी उपलब्ध होतील. याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांनाही होती. ही नवी पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) ३ तारखेपासून उपलब्ध करुन दिल्याने गुरुवारी किरकोळ पुस्तके विक्रेत्यांकडेही आली आहेत.
किंमती वाढल्या
गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रत्येक पुस्तकाची किंमत दहा ते वीस रुपयांनी वाढली आहे. सरासरी किंमतीत २० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेते अनिल मंडलोई यांनी सांगितले. एकुण नऊ पुस्तकांच्या संचासाठी पालकांना ६५० रुपये मोजावे लागणार आहे. सद्यस्थितीत हिंदी व संस्कृत विषयाची वगळता सर्व पुस्तके बाजारात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळी वर्गांना देखील पुस्तके वापरता येतील.

'सोनाली' पुन्हा भेटीला
चाळीसगावचे प्राणीमित्र डॉ.वा.ग.पुर्णपात्रे यांच्या १९८८ मध्ये प्रकाशित 'सोनाली' पुस्तकातील एका उता-याचा प्रकरणाचा धडा म्हणून मराठीच्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीही इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात तो होता. मात्र १९९२ मध्ये त्याला वगळण्यात आले होते. दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात १७ वा धडा म्हणुन 'सोनाली' पुन्हा स्थान मिळाले आहे.

तीन नातींचा 'संगम'
घाट रोड लगत डॉ.पुर्णपात्रे यांचा तितूर नदी किनारी 'संगम' बंगला आहे. येथेच सिंहीण सोनाली, त्यांची कुत्री रुपाली आणि डॉ. पुर्णपात्रेंची नात दिपाली या तिघही नातींचे संगोपन त्यांनी मोठ्या ममत्वाने केले होते. हिस्र प्राण्यांना माणसाळण्याचे अनोखे कसब सोनाली पाठातुन विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे.

अभिमान आणि कौतुकही
प्रसंग लहान असले तरी त्यातुन जीवनात खूप काही शिकता येते. सोनाली पुस्तकाची ओळख अशी आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश झाल्याने आमच्या परिवारासाठीच नव्हे तर चाळीसगावसाठीही अभिमानाची गोष्ट आहे. सत्यघटना विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. याचे कौतुकही आहेच.
- डॉ. हेमांगी सुभाष पुर्णपात्रे
सोनालीकार डॉ.पुर्णपात्रे यांच्या स्नुषा, चाळीसगाव.

Web Title: This year, two-and-a-half-yearly books are available in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.