यंदा शेतकऱ्याच्या घरी पांढरे सोने उशिरा पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 03:40 PM2019-10-06T15:40:56+5:302019-10-06T15:46:01+5:30

परतीच्या पावसाने कापसाला मोठा तडाखा बसला असून, दिवाळीनंतरच शेतकºयाच्या हाती लक्ष्मी येण्याची चिन्हे दिसत आहेत.

This year, white gold will arrive late in the farmer's house | यंदा शेतकऱ्याच्या घरी पांढरे सोने उशिरा पोहोचणार

यंदा शेतकऱ्याच्या घरी पांढरे सोने उशिरा पोहोचणार

Next
ठळक मुद्देदिवाळीनंतरच लक्ष्मी घरातपरतीच्या पावसाने कापूस पिकाला फटकाहरताळे परिसर परिसरातील स्थिती

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : परतीच्या पावसाने कापसाला मोठा तडाखा बसला असून, दिवाळीनंतरच शेतकºयाच्या हाती लक्ष्मी येण्याची चिन्हे दिसत आहेत.
दसºयापूर्वी या भागात कापूस शेतकऱ्यांच्या घरी येत होता. यंदा मात्र पाऊस चांगला असला तरी पिकांची अवस्था अतिशय वाईट आहे. मेमधील बागायती कापसाची दयनिय अवस्था आहे, तर अनेक भागात कपाशीची केवळ उंची वाढली आहे. मात्र त्याला अजूनही फुले व पाती लागलेली नाही.
परिसर केवळ हिरवागार दिसत आहे. परतीच्या पावसाने कापूस पिकाला मोठा तडाखा बसला आहे. यंदा कापसाची वेचणी दसरा व दिवाळी दरम्यान होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे कापूस दिवाळीनंतरच निघण्यास सुरुवात होईल, असे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे पांढºया सोन्याची आवक येण्यासाठी उशीर होणार असल्याने शेतकºयाच्या घरात लक्ष्मीचे आगमनसुद्धा उशिरा होणार असल्याचे चित्र आहे. त्यातच केवळ हिरवेगार रान दिसत असल्याने उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यंदा भाव तेजीत राहतील की काय, अशी आशा शेतकºयांना असली तरी अद्याप भावाबाबत अनिश्चितता दिसून येत आहे.

Web Title: This year, white gold will arrive late in the farmer's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.