सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार यंदाचा दहीहंडी उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:01 PM2019-08-23T12:01:00+5:302019-08-23T12:01:48+5:30

जळगाव : विविध मंडळांकडून शनिवारी गोपाळकालानिमित्त दहीहंडी उत्सवांचे आयोजन केले आहे़ त्यासाठी मंडळे सज्ज झाली असून सांस्कृतिक कार्यक्रम, मिमिक्री ...

 This year's Dahihandi festival will be colored by cultural events | सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार यंदाचा दहीहंडी उत्सव

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार यंदाचा दहीहंडी उत्सव

Next

जळगाव : विविध मंडळांकडून शनिवारी गोपाळकालानिमित्त दहीहंडी उत्सवांचे आयोजन केले आहे़ त्यासाठी मंडळे सज्ज झाली असून सांस्कृतिक कार्यक्रम, मिमिक्री कार्यक्रमांनी दहीहंडी उत्सवांमध्ये रंगत येणार आहे़
१०० वादकांचे ढोलपथक
नवी पेठ गणेश मंडळ चौकात शनिवारी दहीहंडीचा कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. नवी पेठ युथ फोरम, नवी पेठ गणेश मंडळ, युवा गर्जना फाउंडेशनतर्फे अव्यावसायिक युवा गर्जनाचे १०० वादकांचे ढोल पथक कार्यक्रमात रंगत आणणार आहे. क्रेनद्वारे दहीहंडी लावली जाणार असून ती १५ फुट उंच असणार आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी केले आहे.
मिमीक्री
शिवतीर्थ मैदानावर ‘लयभारी दहीहंडी’ हा दहीहंडी उत्सव नेहरू चौक मित्र मंडळातर्फे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. प्रमुख आकर्षण म्हणून लेझर लाईट शो, शहरातील गायकांची सुमधुर गीते, मिमिक्री, नृत्य, तसेच ज्युनियर मकरंद अनासपुरे आणि सनी देओल यांचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. क्रेनद्वारे दहीहंडी लावली जाणार असून ती २० फुट उंच असणार आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष अजय गांधी यांनी केले आहे.
‘ज्योतिर्मयी’तर्फे कार्यक्रम
ज्योतिर्मयी संस्थेतर्फे २३ रोजी दुपारी २ वाजता समर्थ मंदिर महाबळ स्टॉपच्यामागे येथे विविध कार्यक्रम होत आहेत. यात सर्व भजनी मंडळे त्यादिवशी आपापल्या मंडळातर्फे एक कार्यक्रम सादर करतील, असे ज्योतिर्मयीच्या संचालिका प्रा. रेखा मुजुमदार यांनी कळविले आहे.
मोैर्य फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम
श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मौर्य फाऊंडेशनच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमांसह गुण गौरव समारंभ व विविध कार्य्रकमांचे आयोजन करण्यात आले आहे़ देवेंद्र नगरातील बुद्धप्रसाद मौर्य यांच्या निवासस्थानी दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार आहे़ यावेळी सुदामा मिलन व साईबाबा यांचा सचित्र देखावा या कार्यक्रमांचे आकर्षक ठरणार आहे़ भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रमेश मौर्य, निर्मला परदेशी, बलराम मौर्य, शिवनारायण मौर्य, रामनरेश मौर्य, शंभू मौर्य, हरिराम परदेशी, गुड्डू मौर्य, रमेश मौर्य, दिलीप मौर्य, रूपेश मौर्य, परशुराम मौर्य आदिंनी केले आहे़
 

Web Title:  This year's Dahihandi festival will be colored by cultural events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.