गेल्या सहा वर्षात यंदाचा निकाल सर्वात चांगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:03 PM2020-07-18T12:03:15+5:302020-07-18T12:03:44+5:30
बारावी परिक्षा : सरासरी निकालाचा चढता आलेख, वाणिज्य शाखेचे विद्यार्थी अव्वल
जळगाव : तिन्ही प्रमुख शाखांमध्ये यंदा जळगावच्या मुलांनी बारावीच्या परिक्षेत आपली हुशारी दाखवत चांगलीच बाजी मारली. विज्ञान, वाणिज्य, कला या तिन्ही शाखांमध्ये जळगाव जिल्ह्याचा निकाल गेल्या सहा वर्षात यंदा सर्वोच्च राहिला.
बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यंदा बारावीच्या परिक्षेत जळगावच्या मुला-मुलींनी बाजी मारली. केवळ बाजी मारली असंच नाही तर गेल्या सहा वर्षात निकालाची परंपरा मोडीत काढत सर्वोच्च परंपरा निर्माण केली. जळगाव जिल्ह्याचा गेल्या सहा वर्षातील निकाल यंदा सर्वाधिक होता. यंदा ४६ हजार ९६४ विद्यार्थ्यांपैकी ४२ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल ८९.७१ टक्के लागला.
विज्ञान शाखेचा ९६.९५, कला शाखेचा ८१.५३ तर वाणिज्य शाखेचा ९३.१८ टक्के निकाल लागला. २०१९मध्ये बारावीचा जिल्ह्याचा निकाल हा ८६.६१ टक्के लागला होता. २०१५मध्ये ८७.५९, २०१६ मध्ये ८४.४६, २०१७मध्ये ८७.६२, २०१८ मध्ये ८४.२० टक्के निकाल लागला होता.
विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल हा गेल्या अनेक वर्षांपासून चांगला लागत आहे. मात्र त्यामानाने कला शाखेचा निकाल हा ८० ते ९० टक्के यादरम्यानच लागत राहिला आहे.
२०१५मध्ये कला शाखेचा निकाल हा ८१.४१ टक्के लागला होता. त्यानंतर टक्केवारी ७० ते ७९ टक्के यादरम्यानच राहिली. २०२०मध्ये ही टक्केवारी पुन्हा ८१.५३ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
वर्ष शाखा निकाल
२०१५ -विज्ञान ९६.०४
कला ८१.४१
वाणिज्य ८८.६५
२०१६ -विज्ञान ९४.१०
कला ७४.८६
वाणिज्य ८८.०८
२०१७ -विज्ञान ९६.६८
कला ७९.९२
वाणिज्य ९१.६४
२०१८- विज्ञान ९५.३४
कला ७२.८९
वाणिज्य ९१.३४
२०१९- विज्ञान ९५.०७
कला ७७.३०
वाणिज्य ९१.८७
२०२०- विज्ञान ९६.९५
कला ८१.५३
वाणिज्य ९३.१८