हो, ती गिरीश महाजन यांची स्टंटबाजीच.!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:27 PM2017-11-28T17:27:34+5:302017-11-28T17:27:58+5:30
बिबटय़ाला ठार मारल्याशिवाय जिल्हा सोडणार नाही म्हणणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन मुंबईत
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28 - जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा:या नरभक्षक बिबटय़ाला जेरबंद केल्याशिवाय आणि बिबटय़ाला ठार मारल्याशिवाय तीन दिवस जिल्हा सोडणार नाही, असे म्हणत पिस्तुल घेऊन बिबट्याच्या मागावर जाणा:या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची स्टंटबाजी उघड झाली आहे.महाजन रात्रीच रेल्वेने मुंबई रवाना झाले आणि बिबट्याने पुन्हा एका वृद्धेला बळी बनविले आहे. त्यामुळे महाजन यांचा पिस्तुलनामा स्टंटबाजीचाच भाग होता, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ‘लोकमत’ महाजन यांच्या स्टंटबाजीवर प्रकाश टाकल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया राज्यभर उमटू लागल्या आहेत.
दि.27 रोजी गिरीश महाजन हे चाळीसगाव तालुक्यात दौरयावर होते.त्यावेळी त्यांनी स्वत: चे परवाना असलेले पिस्तुल लोड करीत बिबटय़ाला हेरण्याचा प्रय} केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तर स्वत: चा बचाव करीत गिरीश महाजन यांनी मी आयुष्यात चिमणीही मारली नसल्याचा निवार्ळा दिला आहे.चिमणी न मारणारे महाजन यांना मंत्री म्हणून बिबट्याला ठार मारण्याचा अधिकार आहे काय, असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे.
पिस्तुलमुळे महाजनच घायाळ
मार्च 2015 मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात महाजन यांनी कमरेवर पिस्तुल लावून भाषण केले होते.तसेज राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधीमंडळात आमदार डा?.सतीश पाटील यांच्यावर बोटांनी निशाणा साधत शूट करण्याचा इशारा केला होता.तर शहादा तालुक्यात साखर कारखान्यातील कार्यक्रमात दारुच्या बाटल्यांना बायकांची नावे द्या म्हणून सल्ला दिला होता. या तीन प्रकरणात महाजन अडचणीत सापडले होते.त्यांना दिलगिरीही व्यक्त करावी लागली होती.