जी. एच. रायसोनी महाविद्यालयात रंगला गरबा रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 10:34 PM2019-10-07T22:34:41+5:302019-10-07T22:35:22+5:30
जळगाव : शहरातील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या प्रांगणात महाविद्यालयात विध्यार्थ्यासाठी दांडिया व गरबाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना शालेय ...
जळगाव: शहरातील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या प्रांगणात महाविद्यालयात विध्यार्थ्यासाठी दांडिया व गरबाचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक सणांची माहीती होऊन त्यांच्यात विविध सणांची गोडी निर्माण होण्यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या प्रांगणात दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. जी. एच. रायसोनी महाविध्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी असे अनेक उपक्रम राबविले जातात. यावेळी ढोली तारो...ढोल बाजे अशा विविध गाण्यावर गरबा खेळणाऱ्यांचे पाय गाण्याच्या ठेक्यावर थिरकल्याचे पाहायला मिळाले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या विध्यार्थामधून बेस्ट ड्रेस, बेस्ट गरबा, बेस्ट जोडी काढण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राज कांकरिया, प्रा. रफिक शेख, प्रा. मकरंद वाठ, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा, विनोद महाजन यांनी सहकार्य केले. तसेच यावेळी उपस्थित रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी. प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल व सौ. राजुल रायसोनी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. सदर उत्सवातील विजेत्यांमध्ये बेस्ट ड्रेस : आदित्य सुखवानी, भाग्यश्री क्षत्रिय, गरबा किंग व क्वीन : महेश, वैदही भट, दांडिया किंग व क्वीन : ऋषिकेश शर्मा, आरती तौरानी, बेस्ट जोडी : लिसा माधवनी, सिमरन कुकरेजा व हरी यांचा समावेश आहे. यावेळी विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक व इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी देखील गरबा खेळण्याचा आंनद लुटला.