होय आम्ही मतदान करणार.. युवकांचा निर्धार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 06:59 PM2024-03-30T18:59:03+5:302024-03-30T18:59:17+5:30

विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळा येथे मतदान जनजागृती कार्यक्रम.

Yes we will vote The determination of the youth! | होय आम्ही मतदान करणार.. युवकांचा निर्धार!

होय आम्ही मतदान करणार.. युवकांचा निर्धार!

कुंदन पाटील, जळगाव  : अठरा वर्षपूर्ण झाल्यानंतर मतदार नोंदणी करून मतदान करणे हे काम राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव आम्हाला झाली असून आम्ही ' होय,आम्ही मतदान करणार आणि इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करणार असा समान सूर कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळा येथे मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी युवकांनी शनिवारी व्यक्त केला.

राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक कार्यालय, पुणे आणि सामाजिकशास्त्रे प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती कार्यक्रम विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात  आयोजित केला होता.

समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तथा मतदान जनजागृती अभियानाचे नोडल अधिकारी योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी तथा मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी युवराज पाटील, कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळाचे संचालक प्रा. डॉ. अजय एस. पाटील, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. डॉ. सचिन जे. नांदे, युवा आयकॉन रणजित राजपूत, समन्वयक डॉ. मनोज आर. इंगोले उपस्थित होते.  प्रास्ताविक प्रा. डॉ. सचिन जे. नांदे यांनी केले तर डॉ. मनोज आर. इंगोले यांनी आभार मानले. यावेळी  चेतन राखेड, शरद सोनवणे, विनोद शिरसाठ, अमृता सूर्यवंशी  यांनी जागृतीसाठी विविध माध्यमाचा उपयोग करणार असल्याचे सांगितले. सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील विद्यार्थी चेतन राठोड, सौरभ संदांशिव,वैष्णवी कोळी, नम्रता चव्हाण,विजय सुर्यवंशी, अतुल पटेल,वैभवी खारकर, कल्याणी चौरे,विजयराज जाधव या विद्यार्थांनी मतदार जनजागृती या विषयावर पथनाट्य सादर केले.

Web Title: Yes we will vote The determination of the youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव