योग दिनाचा सर्वत्र अपूर्व उत्साह
By admin | Published: June 21, 2017 02:41 PM2017-06-21T14:41:35+5:302017-06-21T14:41:35+5:30
जागतिक योग दिन शहरात अपूर्व उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. शाळा, विद्यालये, विविध संस्थांतर्फे सकाळी योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.21- जागतिक योग दिन शहरात अपूर्व उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. शाळा, विद्यालये, विविध संस्थांतर्फे सकाळी योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुल,काव्यरत्नावली चौकात शेकडो, अबाल, वृद्ध या कार्यक्रमात सहभागी झाले. यंदा जळगावकरांचा उत्स्फूर्त सहभाग दिसला. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. यातच शहर योगमय झाल्याची अनुभूती येत होती.
जळगावातील काव्यरत्नावली चौकात सकाळी 6 वाजता प्रजापिता ब्रrाकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे सामुदायिक योगाभ्यास घेण्यात आला. युवाशक्ती फाउंडेशनतर्फे योगशिक्षिका हेतल पिंपरिया यांनी काव्यरत्नावली चौकात सकाळी 6.45 वाजता योगाबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती व भारत स्वाभीमान न्याय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात सकाळी 7 वाजता योगदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. आरोग्य भारती व जाणता राजा प्रतिष्ठान यांच्यातर्फे सकाळी 7 वाजता काव्यरत्नावली चौकात योगाभ्यास घेण्यात आला.
गोदावरील फाउंडेशन
जागतिक योग दिनानिमीत्त गोदावरी फाऊंडेशनच्या जळगाव सीबीएसई स्कुल, वैद्यकीय महाविद्यालय, भुसावळ आणि सावदा सीबीएसई स्कुल, गोदावरी नसिर्ंग महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील फिजीओथेरेपी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, होमीओपॅथी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय याठिकाणी योग-शिबीर घेण्यात आले.
भुसावळ परिसर
जागतिक योग दिन भुसावळ शहरासह परीसरात उत्साहाने साजरा झाला. भुसावळ रेल्वे विभागातर्फे रेल्वे क्रीडांगणावर योगासने करण्यात डीआरएम आर.के.यादव यांच्यासह एडीआरएम अरुण धार्णिक व विभागीय अधिकारी सहभागी झाले होते. पोलीस ऑफीसर विश्रामगृहातील मैदानावर योगासने करण्यात आली. यात सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस निरीक्षक वसंत मोरे, चंद्रकांत सरोदे व पोलीस अधिकारी,कर्मचारी सहभागी झाले होते.