शाळांमध्ये योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:20+5:302021-06-22T04:12:20+5:30
नंदिनीबाई विद्यालय नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगदिन ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आला. विद्यालयातील उपशिक्षिका जयश्री भंगाळे, मुख्याध्यापिका चारूलता ...
नंदिनीबाई विद्यालय
नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योगदिन ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आला. विद्यालयातील उपशिक्षिका जयश्री भंगाळे, मुख्याध्यापिका चारूलता पाटील, एन.व्ही.महाजन, एस.एस.नेमाडे, एस.के.चोपडे, पी.व्ही.वाणी आदींची उपस्थिती होती.
............
फोटो
जिजामाता माध्यमिक विद्यालय
जिजामाता माध्यमिक विद्यालय येथे स्काऊट शिक्षक किशोर पाटील यांनी योग प्राणायामचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक राजेंद्र आर.खोरखेडे, संजय खैरनार, आशा पाटील, संगिता पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे, संजय पाटील, प्रशांत मडके उपस्थित होते.
............
फोटो
बेंडाळे महिला महाविद्यालयात
अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सोहम योगा व नॅचरोपॅथी केंद्र मूळजी जेठा महाविद्यालय येथील प्रा.पंकज खाजबागे हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. गौरी राणे, डॉ. सुजाता गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा.दीपक पवार यांनी मानले. यशस्वितेसाठी रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.स्नेहल परशुरामे यांनी परिश्रम घेतले.
...........
जयदुर्गा विद्यालय
मेहरूण येथील जय दुर्गा प्राथमिक, माध्यमिक व कै.कौतीक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नीलेश पाटील यांनी योगासनाचे महत्व पटवून दिले.
..........
जळकेतांडा जि.प.शाळा
तालुक्यातील जळकेतांडा जि.प.शाळा येथे योग दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षक सोमनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने करून दाखविली व त्यांच्याकडून करून घेतली. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण आदींची उपस्थिती होती.
.........
फोटो
आर.आर. विद्यालय
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर.विद्यालयात योगगुरू लिलाधर भारूळे यांनी उपस्थितांना योग प्रकारांची माहिती दिली. याप्रसंगी उपमुख्याध्यापक डी.टी.पाटील, जयांश पोळ, विद्या कलंत्री, विजय रोकडे, नितीन पाटील, डी.बी.पांढरे आदींची उपस्थिती होती.
........
फोटो
प. वि. पाटील विद्यालय
प.वि.पाटील विद्या मंदिर येथे मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा केला. उपशिक्षक योगेश भालेराव, निवृत्ती चौधरी, सरला पाटील, दीपाली चौधरी, कल्पना तायडे, स्वाती पाटील, सूर्यकांत पाटील, देवेंद्र चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी यांनी सहभाग घेतला.