योगामुळे मन बुद्धी व शरीर शुद्ध होते -बी.आर. मुळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:40 PM2019-06-21T14:40:46+5:302019-06-21T14:41:02+5:30

योगामुळे झोप व भूक ऊत्तम लाभते.

Yoga improves mind-body and body -BR Root | योगामुळे मन बुद्धी व शरीर शुद्ध होते -बी.आर. मुळक

योगामुळे मन बुद्धी व शरीर शुद्ध होते -बी.आर. मुळक

googlenewsNext


विनायक वाडेकर
मुक्ताईनगर : मी अनेक वर्षांपासून योगा करत असून योगा हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे योगामुळेच मन आणि बुद्धी व शरीर शुद्ध राहते, असे प्रतिपादन बी.आर. मुळक यांनी केले.
योगा हे जीवनाचे अभिन्न अंग आहे, ज्यामुळे तन व मन तंदुरुस्त राहाते. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ११ डिसेंबर २०१४ला संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा केली. योगामुळे मन बुद्धी व शरीर शुद्ध होते योगाचा अर्थ जोडणे यात मन शरीर व आत्मा जोडला जातो.
योगामुळे शरीर लवचिक बनते. नियमित योगाने पूर्ण दिवस ताजेतवाने वाटते व डोके शांत राहत,े रोगप्रतिकारक शक्ती वाढते, लठ्ठपणा कमी होतो. रोगापासून मुक्ती मिळते व सर्व शरीराला नियमित रक्त पुरवठा होतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो, शरीराला आॅक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. गर्भावस्थेतही फायदा होतो. योगामुळे झोप व भूक ऊत्तम लाभते.

Web Title: Yoga improves mind-body and body -BR Root

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.