योग, ध्यान आणि अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:38+5:302021-06-21T04:12:38+5:30

आजच्या आधुनिक युगाच्या धावपळीच्या जीवनात आपले खान-पान व राहणीमान यांच्यात बराच बदल झालेला आहे. या बदलामुळे आपल्याला रक्तचाप (ब्लडप्रेशर), ...

Yoga, meditation and study | योग, ध्यान आणि अभ्यास

योग, ध्यान आणि अभ्यास

Next

आजच्या आधुनिक युगाच्या धावपळीच्या जीवनात आपले खान-पान व राहणीमान यांच्यात बराच बदल झालेला आहे. या बदलामुळे आपल्याला रक्तचाप (ब्लडप्रेशर), मधुमेह (डायबिटीज), संधिवात, लठ्ठपणा, भयानक डोकेदुखी या सारख्या अनेक गंभीर आजारांनी आपण ग्रस्त झालो आहोत. तेव्हा आपले लक्ष योग मार्गाकडे जाते. आजच्या आधुनिक युगातील डॉक्टरमंडळीसुद्धा सांगतात की योग केल्यामुळे आपण शारीरिकदृष्ट्या स्वस्थ राहू शकतो.

जर, आपण योग साधनेच्या फायद्याची विवेचनात्मक चर्चा केली असता, दररोज योग केल्याने शरीराचेे स्वास्थ्य आणि त्या व्यतिरिक्त अधिक मानसिक शांती मिळते. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आपल्या अंतरी ऊर्जेचा विकास होतो. अशाप्रकारे योगाद्वारा आपण आपले शरीरच नव्हे तर आपले मनदेखील स्वस्थ राखू शकतो.

योगाचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ हठयोग, प्राणयोग, राजयोग, कुंभक आणि ज्ञानयोग इत्यादी. योगाचे जेवढे प्रकार आहेत त्यांना कृतीत आणण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो, कारण हा योग कठीण आहे. परंतु योग एक अशी विधी आहे जी फारच सोपी आणि सहज करण्यासारखी आहे. जी करण्यासाठी आपणास खास मुद्रा तसेच विशिष्ट आसनात बसण्याची आवश्यकता नसते. हा असा सहज सोपा प्रकार आहे की ज्याचा अभ्यास कोणीही करू शकतो. भले तो सुदृढ असो अथवा आजारी. हा सुरत-शब्द योग कोणीही करू शकतो. हा सुरत-शब्द योग आपण आपल्या घरी किंवा आपल्या कार्यालयातसुद्धा करू शकतो.

योगाचा दररोज अभ्यास केल्याने इतर सर्व योगांचा यामध्ये समावेश आपोआपच होतो. हा केवळ आपल्या शरीरालाच नव्हे तर आपल्या आत्म्यालासुद्धा स्वस्थ ठेवतो. परम संत कृपाल सिंह महाराजांनी या योगाबाबत म्हटले आहे की, ‘जर आपला आत्मा सुदृढ झाला तर आपले मन आणि शरीर आपोआपच सुदृढ होईल.’

सुरत-शब्द योग आपणास समजावितो की, चेतना आपल्या आत्म्याचे बाह्यरूप आहे. जेव्हा ती प्रभूच्या शब्दाबरोबर जोडली जाते तेव्हा आपण जिथून आलेलो आहोत, तेथे परमपिता परमेश्वराच्या निजधामी पुन्हा घेऊन जाते. योगामुळे आपले लक्ष जे बाह्य जगाकडे जाते, त्याला आपण आंतरिक दुनियेत घेऊन जाऊ शकतो, यालाच मेडिटेशन (ध्यानाभ्यास), भजन-सुमिरन आणि ध्यान टिकवणेसुद्धा म्हटले गेले आहे. याचा अभ्यास कोणीही करू शकतो, भले ते लहान मूल असो अथवा वृद्ध, भले एखाद्या धर्माला मानणारा असो अथवा दुसऱ्या धर्माला मानणारा असो, भले तो एका देशाचा रहिवासी असो अथवा दुसऱ्या देशात राहणारा असो.

योगाचा दररोज अभ्यास केल्याने आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रभूचे रूप दिसू शकते. ज्यामुळे आपल्या अंतरी सर्वांप्रति प्रेमभाव आपोआप जागृत होऊ लागतो. आपण शांतीपूर्ण जीवन व्यतीत करू शकतो, ज्याच्या परिणामस्वरूप आपल्यापासून ही शांती हळूहळू आपल्या परिवारात, समाजात आणि देशातून संपूर्ण विश्वात पसरली जाते. असे केल्याने या धरतीवर स्वर्गाची कल्पना प्रत्यक्ष साकार होऊ शकते.

- संत राजिन्दरसिंह महाराज

Web Title: Yoga, meditation and study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.