योग प्राण विद्या ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:01+5:302021-06-05T04:13:01+5:30

जळगाव : योग प्राण विद्या ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मोहन जोशी यांनी केले. लोकमत व श्वेता पब्लिसिटी आयोजित ...

Yoga prana vidya is the need of the hour | योग प्राण विद्या ही काळाची गरज

योग प्राण विद्या ही काळाची गरज

Next

जळगाव : योग प्राण विद्या ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मोहन जोशी यांनी केले. लोकमत व श्वेता पब्लिसिटी आयोजित व वेदचक्षू ग्लोबल, जय महेश ग्रुप, पीएचएच टीम व जय गजानन एस्ट्रोवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय हिलिंग कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कार्यशाळेत रमणाश्रमाच्या हिलर व ट्रेनर पूजा लढ्ढा, राजेश मंडोरे यांचाही सहभाग होता. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी डॉ. चंद्रशेखर सिकची यांनी कोविड काळात लहान बालक व सर्वांनी कशी व कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. नंतर पूजा लढ्ढा यांनी श्वासोच्छ्‌वासाचे महत्त्व, खरी व योग्य पध्दत, हिलिंग म्हणजे काय, हिलिंगचे फायदे, हिलिंगमधील क्षमापणा साधना, मंत्रसाधना, ध्यानसाधना व कोरोनाकाळात हिलिंगद्वारे मानसिक व शारीरिक व इम्युनिटी कशी राखावी, याबाबत मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी लोकमतचे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी ‘लोकमत’ वाचक व सर्व जनतेच्या आरोग्य व हितासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. समारोप कार्यक्रमात मोहन जोशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच तसेच हिलिंगसंदर्भातील मोफत कार्यशाळा व ट्रेनिंग व रमणाश्रमच्या विविध उपक्रमासाठी संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Yoga prana vidya is the need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.