चांगल्या आरोग्यासाठी योग, प्राणायम गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:33+5:302021-06-22T04:12:33+5:30
भुसावळ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योग शिबिर पार पडले. काही ठिकाणी ऑनलाइन तर काही ठिकाणी सामाजिक ...
भुसावळ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योग शिबिर पार पडले. काही ठिकाणी ऑनलाइन तर काही ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळत प्रत्यक्ष शिबिर घेण्यात आले. कोरोना काळात योग व प्राणायम अत्यंत उपयुक्त असून, एकूणच नेहमीसाठीही योग चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे असल्याचे विविध ठिकाणी मार्गदर्शकांनी सांगितले.
भुसावळ
भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहरतर्फे आमदार संजय सावकारे यांच्या विशेष उपस्थितीत योग शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमास शहराध्यक्ष परीक्षित बर्हाटे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, वैद्यकीय आघाडी संयोजक उत्तर महाराष्ट्र डॉ. नि. तू. पाटील, जिल्हा चिटणीस शैलजा पाटील, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, सतीश सपकाळे, ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण सोयंके, शंकर शेळके, डॉ. सनी जैन, शशिर जावळे, विशाल जंगले, अनिल पाटील, संजय बोचरे, नंदकिशोर बडगुजर, गोपीसिंग राजपूत प्रशांत भट, सागर जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास योगगुरू देवेंद्र पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.