नेरी येथे गायींनी भरलेले वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 04:30 PM2019-08-06T16:30:45+5:302019-08-06T19:09:52+5:30
नेरी, ता. जामनेर , जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या गाडेगावनजीक एका वाहनात अतिशय निर्दयीपणे कोंबलेल्या अवस्थेत नागरिकांनी डझनभर गायींची ...
नेरी, ता.जामनेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या गाडेगावनजीक एका वाहनात अतिशय निर्दयीपणे कोंबलेल्या अवस्थेत नागरिकांनी डझनभर गायींची सुटका केली आणि कुसुंबा येथील गोशाळेत त्या गुरांची रवानगी करण्यात आली.
मंगळवारी सकाळी एक अज्ञात व्यापारी येथील बाजारातून ११ गायी व एक बैल अशी गुरे घेऊन जळगावकडे जात होता. तेव्हा गोडगावनजीक देवीदास इंगोलेकर यांच्यासह काही नागरीकांनी वाहन अडवून तपासणी केली. अतिशय निर्दयीपणे ही गुरे या वाहनात कोंबली होती.
ही गुरे कोणी खरेदी केली अथवा या गुरांचा मालक कोण, अशी विचारणा केली असता चालकाने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या घटनेची माहिती जामनेर पोलिसांना देण्यात आली.
पो.उ.नि. विकास पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून या वाहनाची चौकशी केली. गाडीचा व गुरांचा मालक सोबत नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गुरांच्या कत्तलीसाठी अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चालकाास अटक करण्यात आली. नंतर गुरांनी भरलेले वाहन कुसुंबा येथील गो शाळेत रवाना करण्यास आले.
या प्रकरणी चालकाविरूध्द जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.उ.नि. विकास पाटील तपास करीत आहे.