योगिता पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:08+5:302021-01-18T04:15:08+5:30
जळगाव - महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघातर्फे दिला आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण नुकतेच लोणावळा येथे शालेय शिक्षणमंत्री वर्षा ...
जळगाव - महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघातर्फे दिला आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण नुकतेच लोणावळा येथे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मनपा शाळा क्रमांत २३ च्या शिक्षिका योगिता नितीन पाटील (कापसे), यांना देखील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. योगिता पाटील या जामनेर येथील पंडित नामदेव पाटील यांच्या सून आहेत.
शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी निखिल ठक्कर
जळगाव - शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या उप महानगर प्रमुखपदी येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक निखिल ठक्कर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ,जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे,शिव व्यापारी सेनेचे महानगर प्रमुख पूनम राजपूत ,प्रशांत सुरळकर, ॲड.राजेश पावसे आदींसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अर्थसंकल्पासाठी जमाखर्चाचे विवरण मागविले
जळगाव - मनपाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर करण्यात येणार असून, सोमवारी सर्व विभागांना जमा व खर्चाचे विवरण पत्र भरून सादर करण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे. विवरण सदर झाल्यानंतर मंगळवारी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे अंदाजपत्रकासंदर्भात बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. गेल्यावर्षी मनपाने १२०० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते.
त्या नगरसेवकांच्या याचिकेवर आज कामकाज
जळगाव - घरकुल घोटाळ्यात दोषी ठरविण्यात आलेल्या नगरसेवकांना ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणुन दाखल अपिलात उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. नगरसेवकांच्या अपिलात काय कामकाज होते. त्यावर जिल्हा न्यायालयातील दाव्याची सुनावणी ठरणार आहे. भाजपच्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी जिल्हा न्यायालयात दावा दाखल आहे. त्यात २९ जानेवारी रोजी कामकाज होणार आहे.
तापमानात पुन्हा वाढ
जळगाव - यंदा थंडीचे प्रमाण अत्यल्पच राहिले असून, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवला होता. मात्र, अन्य दिवसात थंडी गायबच झाली आहे. दोन दिवसांपूर्वी थंडीचा वाढलेला कडाका पुन्हा गायब झाला असून, रविवारी तापमानाचा पारा वाढला होता. रविवारी कमाल तापमान ३३ अंशावर तर किमान तापमान १९ अंशापर्यंत वाढले होते. त्यामुळे थंडी गायबच झाली होती. दरम्यान, १९ जानेवारीनंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.