यू आर माय व्हॅलेन्टाईन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 07:56 PM2018-02-14T19:56:36+5:302018-02-14T20:00:58+5:30
जळगावात सोशल मिडीयावर बहुरंगी पोस्ट
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१४ : व्हॅलेन्टाईन सप्ताहामध्ये १४ फेब्रुवारी रोजी साजºया होणाºया व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने बुधवारी तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. ‘यू आर माय व्हॅलेन्टाईन’ हे ऐकण्यासाठी आसुसलेल्या तरुणाईने भेटवस्तू तसेच प्रेमाचे प्रतिक असलेला लाल गुलाब देऊन प्रियकर व प्रेयसीला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. तरुणाईसोबतच वृद्धांचा आणि प्रौढांच्या व्हॅलेन्टाईन डे संदर्भात बहुरंगी पोस्टने सोशल मिडीयावर धम्माल उडविली.
तरुणाईने घेतला उद्यान व मेहरुण तलाव परिसराचा आधार
प्रियकर व प्रेयसी यांच्या मनाचा ठाव घेत प्रेम व्यक्त करणे तशी अवघड बाब.आपल्या भावना व्यक्त करताना कोणतीही नकारात्मक गोष्ट होऊ नये यासाठी तरुणाईने व्हॅलेन्टाईन डे च्या मुहूर्तावर उद्यान, मेहरुण तलाव परिसर, चित्रपटगृह, कॉफी शॉप, रेस्टॉरंट, कॉलेज कॅन्टीनचा आधार घेतला. काही प्रेमी युगलांनी पद्मालय, मनुदेवी, अजिंठा या ठिकाणी जात निवांत शोधला.
गिफ्ट शॉपी व कॉलेज कट्टयांवर वर्दळ
प्रेमाचे सादरीकरण करण्यासाठी अनेक प्रेमीयुगलांनी गिफ्टचा पर्याय निवडला. आपल्या व्हॅलेन्टाईनला प्रभावित करण्यासाठी महागड्या वस्तू तसेच टेडी, भेटकार्ड, लव्ह बर्डचे गिफ्ट परस्परांना देण्यात आले.आपल्या प्रियकर व प्रेयसीची एक झलक पाहण्यासाठी कॉलेज कट्टयावर दिवसभर वर्दळ होती.
हार्ट शेफ बुकेला मागणी सर्वाधिक
प्रेमाचे प्रतिक असलेल्या लाल गुलाबाला व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी सर्वाधिक मागणी होती. आकर्षक आणि नाजूक असणाºया डच गुलाबाची २० रुपये प्रती नग विक्री बुधवारी झाली. साधा गुलाब १० रुपये तर गुलाबाच्या कोनची ३० रुपये दराने विक्री झाली. तरुणाईकडून सर्वाधिक हार्ट शेफ च्या बुकेला मागणी होती. हा बुके ४०० ते ८०० रुपये दराने विक्री झाला.
गुलाबाची मागणी वाढली
प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचे फूल देण्यात येत असल्याने विक्रेत्यांनी देखील दोन दिवसांपासून गुलाबाची जादा खरेदी केली होती. पुणे, मुंबई, नाशिकसह स्थानिक शिरसोली, वावडदा, पाळधी, बांभोरी, मुक्ताईनगर येथून गुलाबाच्या फुलांची शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. बुधवारी गुलाबाच्या फुलांची मागणी वाढली होती.