डिप्लोमा परीक्षेसाठी २४ मे पर्यंत अर्ज करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:17 AM2021-05-19T04:17:11+5:302021-05-19T04:17:11+5:30

जळगाव : डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षांना लवकरचं प्रारंभ होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २४ मे पर्यंत अर्ज सादर करता ...

You can apply for the diploma exam till May 24 | डिप्लोमा परीक्षेसाठी २४ मे पर्यंत अर्ज करता येणार

डिप्लोमा परीक्षेसाठी २४ मे पर्यंत अर्ज करता येणार

Next

जळगाव : डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षांना लवकरचं प्रारंभ होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २४ मे पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्यावतीने पत्र जारी करण्‍यात आले आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये बंद आहेत. शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. सध्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना नुकतीच सुरूवात झाली आहे तर काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहे. डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या परीक्षा देखील लवकरचं प्रारंभ होणार आहेत. सद्यस्थितीला वेळापत्रक जाहीर झालेले नाही. पण, सोमवारी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षासाठी अर्ज सादर करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २४ मेपर्यंत मुदत देण्‍यात आली आहे. काही कारणास्तव विद्यार्थ्यास मुदतीत परीक्षा अर्ज करता आले नाही. अशा विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह ३० मे पर्यंत अर्ज भरता येईल. याच काळात महाविद्यालयांनी सुध्दा अर्जांची पडताळणी करून मंडळाकडे ते अर्ज सादर करावयाचे आहे.

Web Title: You can apply for the diploma exam till May 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.