अशी वाहतुकीची शिस्त आपण पाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 01:24 PM2019-07-06T13:24:59+5:302019-07-06T13:25:19+5:30

सध्या केलिफोर्निया येथील फ्रिमोंट येथे आहे.सॅनफ्रान्सिस्को विमान तळापासून जवळ जवळ ४५ मैल फ्रिमोंट म्हणून गाव आहे. प्रचंड वाहतूक,४५ मैल ...

You follow the discipline of such traffic ... | अशी वाहतुकीची शिस्त आपण पाळा...

अशी वाहतुकीची शिस्त आपण पाळा...

Next

सध्या केलिफोर्निया येथील फ्रिमोंट येथे आहे.सॅनफ्रान्सिस्को विमान तळापासून जवळ जवळ ४५ मैल फ्रिमोंट म्हणून गाव आहे. प्रचंड वाहतूक,४५ मैल येताना किती तरी चौक,किती तरी सिग्नल व्यवस्था कार्यरत होती. परंतु एक पण वाहतूक पोलीस दिसला नाही. सगळे लोकं समजूतदार,वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन,आणि डोकं शांत ठेवणारे वाहनमालक. दोन वाहनांमध्ये कमीत कमी ५० फूट अंतर ठेवण्याची इथे पद्धत आहे.रस्ता ओलांडताना माणूस दिसला की चालक ४० ते ५० फूट गाडी उभी करतो.रस्ता क्रॉस करताना फुटपाथ वर खांबावर लाल लाईट चे बटन आहे, ते आपण दाबले की संपूर्ण ट्रॅफिक थांबतो. इथे पायी चालणाऱ्यांना वाहनचालक आणि मालक सन्मान देतात. आपल्या कडे सुद्धा लोकांनी समजूतदारपणा दाखवला आणि वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर आपल्याकडे सुद्धा वाहतूक कर्मचाऱ्यांवरील भार कमी होईल. पोलीस फक्त विमानतळावर दिसले बाकी अजून चौकात, हायवेवर,मार्केट किंवा मॉल मध्ये कुठेच दिसले नाही. कुठेतरी लहान मोठा अपघात झाल्यावर काही मिनिटात पोलीस येतात.सगळी कडे कॅमेरे आणि उपग्रहाच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. ४५मैलाच्या रस्त्यात खूप गावे लागतात पण पोलिस कुठेच दिसले नाही आणि आपल्या जळगाव शहरात जवळ जवळ १०० कर्मचारी आहेत. लोकांना शिस्त लावणे ही खूप महत्त्वाची बाब आहे.वाहतुकीचा नियम मोडल्यास जब्बर दंड आकरावा.त्या शिवाय शिस्त लागणार नाही. गाड्यांचा वेग गावात ताशी १00 असतो पण एमबुलन्स चा सायरन वाजला की तसा ट्रॅफिक थांबते आणि एम्ब्युलन्सला वाट करून देतात
- जतिन ओझा

Web Title: You follow the discipline of such traffic ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव