तुका म्हणे आम्हा एकांताचा वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:41 PM2020-04-14T23:41:55+5:302020-04-14T23:42:13+5:30

सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या ...

You say the smell of solitude! | तुका म्हणे आम्हा एकांताचा वास!

तुका म्हणे आम्हा एकांताचा वास!

googlenewsNext

सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या सेवेत झोकून घेतले आहे. अश्या वेळेस या रोगाला पळवून लावण्यासाठी सर्वांना आपल्या घरातच राहून राष्ट्राच्या सेवेची संधी मिळालेली आहे.
पण बरेच जण त्या नियमांचे पालन करत नाहीत. खरं म्हणजे एकांत म्हणजे ज्ञानी मनुष्यासाठी संधी तर मूर्खांसाठी संकट आहे. आज रोजी भक्तीसाठी असो किंवा आपल्यातील असलेल्या कलेला वृद्धिंगत करण्यासाठी सर्वात महत्वाचा म्हणजे असतो तो एकांत. संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर एकांत म्हणजे भगवंताला प्राप्त करण्यासाठी एक संधी समजतो. त्यामुळेच आम्हाला एकांताचा प्रवास सुकर वाटतो आणि तो भगवंतासाठी आपण अर्पण करून आपण निश्चितच भगवंताला प्राप्त करू शकतो.
तुकाराम महाराज म्हणतात, माझा जर एकांतात वास घडला तर जगाशी माझा येणारा संबंध टाळून मी आपल्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहचेल कारण भगवंताची भक्ती असो की ध्येयाकडे वाटचाल ती आपल्याला एकांतानेच साध्य करता येईल.
साधकांसाठी नित्य एकांत ही पर्वणीच असते. आपण एकांत निवडला तर आपले गुण-दोष पाहणारे लोक तिथे नसल्याने त्यांचे गुण-दोष हि आपल्या अंगी येत नाही. दोषापासून दूर जाऊन आपण निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. सर्वांनी संतांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या घरातच थांबून एकांत निवडायला हवा व प्रशासनाच्या नियमांचे पालन करायला पाहिजे. जेणेकरून आपण या कोरोनासारख्या रोगाला पळवून लावू शकतो आणि भगवंतही आपल्याला संकटातून लवकरच सावरेल.
- गजानन महाराज वरसाडेकर (जळगाव)

Web Title: You say the smell of solitude!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव