तुम्ही घरीच थांबा, रुग्णांची काळजी आम्ही घेऊ - जिल्हाधिकाऱ्यांचे नातेवाईनेकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 09:55 PM2020-06-19T21:55:25+5:302020-06-19T21:55:38+5:30

कोरोना रुग्णालय, कोविड केअर सेंटरमधील नातेवाईकांचा वावर थांबविणार

You stay at home, we will take care of the patients - the appeal of the Collector to the relatives | तुम्ही घरीच थांबा, रुग्णांची काळजी आम्ही घेऊ - जिल्हाधिकाऱ्यांचे नातेवाईनेकांना आवाहन

तुम्ही घरीच थांबा, रुग्णांची काळजी आम्ही घेऊ - जिल्हाधिकाऱ्यांचे नातेवाईनेकांना आवाहन

Next

जळगाव : कोरोना रुग्णालयात रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक थांबण्यासह रुग्णालयात त्यांचा वावर जास्त असतो. हा वावर थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून रुग्णांची काळजी आम्ही घेऊ, तुम्ही घरीच थांबा, असा विश्वास नातेवाईकांमध्ये निर्माण करण्यावर भर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. या सोबतच कोरोना रुग्णालयातील ताण कमी करण्यासाठी तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटर अधिक सक्षम करण्यावरही भर राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी राऊत यांनी कोविड रुग्णालयात पाहणी केली. या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.


नातेवाईकांना दूर ठेवून संवादाची सुविधा उपलब्ध करणार
कोरोना रुग्णालयात रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक थांबणे योग्य नसून त्यांचा येथे वावरही नको. नातेवाईकांना रुग्णाची चिंता असते, ती दूर करण्यासाठी डॉक्टर, संपूर्ण यंत्रणा रुग्णांची काळजी घेईल, असा विश्वास त्यांच्यात निर्माण करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले. यासाठी नातेवाईकांनी घरीत थांबावे, असे आवाहनही त्यांनी केले. या सोबतच दाखल रुग्णांना घराची, कुटुंबातील सदस्यांची काळजी असते, ती दूर करण्यासाठी आॅनलाईन संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.


कोविड केअर सेंटर सक्षम करणार
कोरोना रुग्णालयात रुग्णांची संख्या कमी करून ताणही कमी करण्यासाठी तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटर सक्षम करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले. असे झाल्यास तेथेच तत्काळ निदान होऊन वेळेत उपचार होण्यासही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


आॅक्सिजन बेड वाढविणार
कोरोना रुग्णालयात पाईप आॅक्सिजनची सुविधा असणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात रुग्णालयातील सर्व बेड आॅक्सिजन बेड करण्यावर भर राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.


कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचीही काळजी घेणार
रुग्णालयात घडणाºया दुर्घटना टाळण्यासाठी परिचारिका व इतर कर्मचाºयांचे व्यवस्थापन करण्यात येणार असून त्यांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जाईल. कर्मचारी काम करीत असताना त्यांनाही काही बाधा होऊ नये म्हणून त्यांच्या अडचणी सोडविल्या जातील, असेही ते म्हणाले.


आयएमए डॉक्टरांसोबत चर्चा
रुग्णालयात ड्युटी लावण्याच्या मुद्यावरून आयएमए डॉक्टरांमध्ये वाद निर्माण झाला होता. हा वाद दूर करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.


जळगावसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाचा स्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यात त्यांनी खास जळगावचा उल्लेख करीत येथे डॉक्टरांना मुंबई व इतर ठिकाणच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगितले. या मार्गदर्शनाममुळे येथील डॉक्टरांना बळ मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.


केंद्रीय समिती आज घेणार आढावा
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती जळगावात दाखल झाली असून शनिवारी काम सुरू करणार आहे. यात येथील वाढता कोरोना संसर्ग, मृत्यूदर यांची माहिती घेणार आहे. तसेच या समितीची बैठकही होणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
वाळूच्या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, हा विषय अनेकांकडून समजला. या प्रकरणी कारवाई करावीच लागेल, असे नमूद केले.


समिती आज घेणार आढावा
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र्र सरकारकडून जिल्ह्यात केंद्रीय पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी आपण केली होती. त्यानुसार त्याची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दोन अधिकाºयांच्या पथकाची नियुक्ती केली असल्याचा दावा खासदार रक्षा खडसे यांनी दिली. ही समिती २० रोजी जिल्ह्यात आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी खासदार खडसे या समितीची भेट घेणार आहे.
या समितीमध्ये केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्य तथा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे वरिष्ठ प्रादेशिक संचालक (पुणे) डॉ. अरविंद अलोने आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. एस. डी. खापर्डे यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

Web Title: You stay at home, we will take care of the patients - the appeal of the Collector to the relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.