पोरा-पोरींचं वेगळंच 'ट्रान्झॅक्शन'; घरच्यांना 'गुलूगुलू चॅटिंग' सापडू नये म्हणून GPay वर प्रेमाच्या गप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:13 PM2022-11-29T17:13:08+5:302022-11-29T17:13:20+5:30

इन्स्टाग्राम, फेसबुक, तसेच व्हॉट्सअॅपवरून केलेल्या चॅटिंगवर पालकांचे विशेष लक्ष असते. अनेक वेळा पालकांकडून मुला-मुलींचे सोशल मीडिया अकाउंटही तपासले जाते.

Young boys and girls are using Google Pay and Phone Pay for messages | पोरा-पोरींचं वेगळंच 'ट्रान्झॅक्शन'; घरच्यांना 'गुलूगुलू चॅटिंग' सापडू नये म्हणून GPay वर प्रेमाच्या गप्पा!

पोरा-पोरींचं वेगळंच 'ट्रान्झॅक्शन'; घरच्यांना 'गुलूगुलू चॅटिंग' सापडू नये म्हणून GPay वर प्रेमाच्या गप्पा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : इन्स्टाग्राम, फेसबुक, तसेच व्हॉट्सअॅपवरून केलेल्या चॅटिंगवर पालकांचे विशेष लक्ष असते. अनेक वेळा पालकांकडून मुला-मुलींचे सोशल मीडिया अकाउंटही तपासले जाते, पण पालकांच्या नजरेत 'गुणी बाळ' अशी प्रतिमा राहण्यासाठी मुलांकडून चॅटिंगसाठी पर्यायी अॅपचा वापर केला जात आहे. ते म्हणजे... गुगल पे, पेटीएम, फोन पे... अशा विविध पेमेंट • पचा.... इतरांसाठी आर्थिक व्यवहारासाठी उपयोगी असलेल्या या अॅपचा वापर तरुणांकडून प्रेमाच्या ट्रान्झॅक्शनसाठी होताना दिसून येत आहे.

आपल्या पाल्याकडून तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये. खबरदारी कशी घ्यावी पालकांनी खबरदारी.....

पालकांकडून मुलांचा मोबाइल फोन तपासला जातो. त्यामुळे मुले प्रचलित चॅटिंग अॅप्सऐवजी पर्यायी अॅप्सचा चॅटिंगसाठी वापर करतात. त्यात पेमेंट अॅप्स हा एक पर्याय आहे.

प्रचलित अॅप्सवरील मुलांचे अकाउंट, प्रोफाइल पालकांकडून सतत तपासले जाते. मात्र, पेमेंट अॅप्स किंवा चॅटिंगसाठी प्रचलित नसलेल्या ॲप्सकडे पालकांचे लक्ष जात नाही.

त्यामुळे मुलांकडून अशा अॅप्सचा वापर वाढला आहे. त्या अॅप्सवरून आपली प्रेयसी किंवा प्रियकर यांच्याशी चॅटिंग केले जाते. काही पालक घेतात. त्यात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या मुलांवर पालकांचे विशेष लक्ष असते. 

.... सोशल प्रेमाला विरोध...

सोशल मीडियावर काही जण त्यांच्या प्रोफाइलमधून इतरांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी विविध फोटो, माहिती याचा वापर केला जातो. यातून इतरांना आकर्षण वाढून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते. चॅटिंग करून मैत्री होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांकडून अशा सोशल प्रेमाला विरोध केला जातो.

काय लाइक आणि शेअर केले जातेय, याबाबतही काही पालक मुलांकडून माहिती घेतात, तसेच सातत्याने त्यांचा मोबाइल तपासून उपदेशांचे डोस देतात. त्यामुळे काही अॅपचा वापर करतात.

मुलांना घुसमट झाल्यासारखे वाटते. आपले पालक आपल्यावर संशय घेत आहेत, असा त्यांचा समज होतो. यातून काही मुले चॅटिंगसाठी पर्यायीसुविधेचा गैरवापर.....

१ डिजिटल व्यवहार वाढविण्यासाठी ऑनलाइन व्यवहार, पेमेंट अॅपवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी काही अॅप्स अधिक अपडेट करून, त्यावरून चॅटिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

त्यामुळे व्यवहाराशी संबंधित मेसेजची देवाण-

घेवाण सहज शक्य झाली. मात्र, या अपडेट अॅप्सचा काही जणांकडून गैरवापर सुरु करण्यात आला आहे. त्यातच काही सोशल मीडिया अॅप्सवर विविध नावांनी आयडी बनविण्याचे प्रकारही वाढले आहेत.

Web Title: Young boys and girls are using Google Pay and Phone Pay for messages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.