अल्पवयीन मुलीनेच पळविले मुलाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:45 PM2019-08-05T12:45:19+5:302019-08-05T12:47:48+5:30

अपहरणाचा गुन्हा दाखल : आईशी भांडण झाल्याने मुलीने सोडले घर

The young girl escapes the boy | अल्पवयीन मुलीनेच पळविले मुलाला

अल्पवयीन मुलीनेच पळविले मुलाला

Next

जळगाव : प्रेमप्रकरणातून मुलाने मुलीला पळविले असे आपण नेहमीच ऐकतो.. पाचोरा तालुक्यात मात्र अल्पवयीन मुलीनेच मुलाला जबरदस्तीने पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोघांना पिंपळगाव हरेश्वर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले. रविवारी दोघांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून १६ वर्षाची मुलगी २६ जुलै रोजी घरातून गायब झाली होती. आजारी असल्याने आईने तिला पाचोरा येथे दवाखान्यात जाण्यासाठी खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनात बसविले होते. सायंकाळी उशिर झाला तरी मुलगी घरी न आल्याने आईने मुलाला तिचा शोध घ्यायला सांगितले. मुलाने पाचोरा शहरातील सर्व दवाखाने, रेल्वे स्टेशन व बसस्थानक येथे शोध घेतला, मात्र कुठेच माहिती मिळाली नाही तसेच नातेवाईकांकडेही मुलगी नसल्याने कुटुंबाची अधिकच चिंता वाढली होती. याप्रकरणी २७ रोजी आईच्या फिर्यादीवरुन कोणी तरी फूस लावून तिचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
पिंपरी चिंचवड येथे घेतला आश्रय
या मुलीने गावातील एका अल्पवयीनच मुलाला सोबत जबरदस्तीने सोबत घेऊन थेट पुण्यातील पिंपरी चिंचवड गाठले. तेथे त्यांनी मुलाच्या बहिणीकडे आश्रय घेतला. हे प्रकरण अंगाशी येवू शकते या भीतीने मुलाच्या बहिणीने पोलिसांना कळविण्याची तयारी केली, मात्र मुलीने त्यांना त्यापासून रोखले. दुसरीकडे अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापु रोहोम व पिंपळगावचे सहायक निरीक्षक रवींद्र बागुल यांना स्वतंत्रपणे तपास पथके रवाना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथके औरंगाबाद, पाचोरा येथे मुलीचा शोध घेत असताना या मुलीसोबत एक मुलगा असून दोघंही पिंपरी चिंचवड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपळगाव हरेश्वरचे कॉ.राकेश खोंडे, सविता ठाकरे व शिवनारायण देशमुख तर एलसीबीचे विजय पाटील, नरेंद्र वारुळे व दिनेश बडगुजर यांचे पथक पुण्यात धडकले. दोघांना मुलाच्या बहिणीच्या घरुन ताब्यात घेऊन पिंपळगाव येथे आणले. मुलीने तक्रार न दिल्याने दोघांचा जबाब घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: The young girl escapes the boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.